Thursday, April 25, 2024
घरमानिनीFashion'हे' आहेत जगातील सर्वाधिक महागडे शॉपिंग रोड

‘हे’ आहेत जगातील सर्वाधिक महागडे शॉपिंग रोड

Subscribe

शॉपिंग करणे कोणाला आवडत नाही. शॉपिंग वेळी नव्या वस्तू खरेदी करण्याची एक वेगळीच मजा असते. परंतु काही लोकांना शॉपिंगचे ऐवढे वेड असते की, ते अशा ठिकाणांहून शॉपिंग करतात जेथे त्यांना एकाच ठिकाणी सर्वकाही मिळेल. स्वस्तात मस्त मिळणारी ठिकाणं सुद्धा आहेत. पण जगातील अशी काही ठिकाणं आहेत जी सर्वाधिक महागड्या शॉपिंगसाठी ओळखली जातात. (Expensive shopping street in world)

-कॉजवे बे (हॉंगकाँग)

- Advertisement -


स्थानिक लोक याला तुंग लोवानच्या नावाने सुद्धा ओळखतात. हाँगकाँग मधील शॉपिंगसाठी असलेले सर्वाधिक प्रसिद्ध ठिकाणांपैकी एक आहे. येथे तुम्हाला तुमच्या आवडीच्या सर्वकाही गोष्टी खरेदी करता येऊ शकतात.

-वाया मोटे नेपोलियन (मिलान)

- Advertisement -


वाया मोटे नेपोलियन एक हाय क्लास शॉपिंग स्ट्रिट आहे. येथे तुम्हाला इटालियन डिजाइनर्स आणि लक्झरी फॅशन हाउसेसचे बेस्ट कलेक्शन मिळेल. या ठिकाणाला फॅशन कॅपिटलचा पुरस्कार ही मिळाला आहे.

-बॉन्ड स्ट्रिट (लंडन)


बॉन्ड स्ट्रिट लंडन लक्झरी सामानांची खरेदी करण्यासाठी प्रसिद्ध आहे. हे ठिकाण लंडन मधील वेस्ट अॅन्डमध्ये ऑक्सफोरर्ड स्ट्रिट जवळ आहे.

-फिफ्थ एवेन्यू (न्युयॉर्क)


मिडटाउन मॅनहटन येथून जाणारा फिफ्थ एवेन्यू एक प्रसिद्ध रोड आहे. न्यूयॉर्क मधील सर्वाधिक प्रसिद्ध शॉपिंग पैकी एक मानले जाते. येथे उबर-पॉश स्टोर आणि डिझाइनर्सचे बेस्ट कलेक्शन मिळते.

-गिन्जा (टोक्यो)


गिन्जा टोक्यो मधील सर्वाधिक प्रसिद्ध शॉपिंग लाइन पैकी एक आहे. येथे तुम्हाला लक्झरी स्टोर व्यतिरिक्त आणखी काही गोष्टी सुद्धा मिळू शकतात.

-पिट स्ट्रीट मॉल (सिडनी)


डिझाइनर ब्रांन्ड-स्टाइलिश कपड्यांसह फॅशन प्रोडक्ट्सच्या खरेदीसाठी सिडनी मधील पिट स्ट्रिट मॉल एकदम बेस्ट आहे. या ठिकाणाला ऑस्ट्रेलियातील सर्वाधिक बिझी रिटेल स्ट्रिटच्या नावाने ओळखले जाते. (Expensive shopping street in world)

-मायोंग डोंग (सियोल)


दक्षिण कोरियातील मायोंग डोंग जगातील सर्वाधिक महागडे शॉपिंग स्ट्रीटपैकी एक असल्याचे मानले जाते. येथे तुम्हाला लक्जरी ब्रँन्डचे सर्वकाही सामान अगदी सहज मिळेल.


हेही वाचा- मुंबईत ‘या’ ठिकाणी मिळते सर्वात स्वत दरात Artificial jewellery

- Advertisment -

Manini