Eco friendly bappa Competition
घर लाईफस्टाईल बाबो, पाण्याच्या एका बाटलीची किंमत 1.15 लाख रुपये

बाबो, पाण्याच्या एका बाटलीची किंमत 1.15 लाख रुपये

Subscribe

रोटी, कपडा आणि मकान हे आपल्याला गरजेचे असते, त्याचप्रमाणे पाणी सुद्धा आपल्या दैनंदिन आयुष्यासाठी फार महत्त्वाचे असते. आपण बाजारातून पाण्याची बॉटल जरी घेतली तरीही ती तुम्हाला 20-40 रुपयांना मिळते. मात्र तुम्ही कधी विचार केला आहे का, एका पाण्याच्या बॉटलची किंमत 1.15 लाखांपर्यंत असू शकते?

जगातील अशा काही कंपन्या आहेत ज्यांच्या पाण्याच्या बॉटलची किंमत ऐकून तुम्ही हैराण व्हाल. अशातच जाणून घेऊयात जगातील सर्वाधिक महागडे पाणी ऐवढे खास का असते.

- Advertisement -

BLVD Water


जॉन मोंसरी नावाच्या कंपनीच्या एका पाण्याच्या बॉटलची किंमत 2232 रुपये आहे. यामधील पाणी ऑस्ट्रेलियातील तस्मानिया मध्ये असलेल्या एका झऱ्यातून आणले जाते. हे एक स्पार्कलिंग वॉटर आहे.

- Advertisement -

Berg Water


हे पाणी ग्रीनलँन्ड मधील आइसबर्ग म्हणजेच हिमखंडातून आणले जाते. आइसबर्गच्या माध्यमातून तयार केले जात असल्याने त्याचे नाव बर्ग असे ठेवले गेले आहे. हे कॅनडात तयार केले जाते. या पाण्याची किंमत 803 रुपये प्रति 750 मिलीलीटर आहे.

Minus 181 Water


उत्तर जर्मनीतील 181 मीटर खोलवरुन हे पाणी काढले जाते. या बॉटलमध्ये केवळ 681 मिलीलीटर पाणी येते. हे पाणी रीडल कंपनीकडून तयार केले जाते. ज्याची 1756 मध्ये स्थापना करण्यात आली होती. या पाण्याची किंमत 4134 रुपये आहे.

ROI Water


स्लोवेनियामध्ये या पाण्याची बॉटलिंग होते. यामध्ये मॅग्नेशियमचे प्रमाण खुप असते. याचे पाणी एका खास झऱ्यातून आणले जाते. याच्या पाण्याची 500 मिलीलीटरची बॉटल 4878 रुपयांना मिळते.

UISGE Water


पाण्याची ही बॉटल तुम्हाला केवळ 100 मिलीलीटरमध्येच मिळणार आहे. हे पाणी झऱ्यातून जमा केले जाते. जे खरंतर व्हिस्कीसोबत पेयरिंग करण्याच्या उद्देशाने तयार केले आहे. हे पाणी स्कॉटलँन्ड मधील असून त्याची किंमत 7772 रुपये आहे.

O Amazon Water


हे पाणी ना झऱ्यातून ना कोणत्याही हिमखंडातून आणले जाते. हे पाणी धुक्यांमधून काढले जाते. डोंगरांवर खास प्रकारच्या जाळ्या लावल्या जातात, त्याला धुकं चिकटले जाते. त्यानंतर त्यामुळे जमा झालेले पाणी बॉटलमध्ये टाकले जाते. याची किंमत 9095 रुपये प्रति 750 मिलीमीटर आहे.

Bling H2O


हे पाणी अमेरिकेतील एका झऱ्यातून आणले जाते. या पाण्याची बॉटल काचेची असते. त्यावर स्वारोवस्की क्रिस्टल लावलेले असतात. बॉटल दिसण्यास अगदी आकर्षक दिसते. या पाण्याच्या बॉटलची किंमत 18,107 रुपये आहे.


हेही वाचा- त्वचेचे सौंदर्य वाढवण्यासाठी गुणकारी Red Wine, जाणून घ्या फायदे

- Advertisment -