हल्ली वाढत्या प्रदूषणामुळे, जीवनशैली तसेच खाण्याच्या वाईट सवयींमुळे आपल्याला त्वचेशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागते. पिंपल्स ही एक आता सर्व सामान्य समस्या झाली आहे. प्रदूषण, जीवनशैली,खाण्याच्या वाईट सवयींमुळे आपल्या चेहऱ्यावर पिंपल्स येऊ लागतात. योग्यवेळी काळजी घेतली नाही तर चेहऱ्यावर डाग येऊ लागतात. ज्यामुळे चेहऱ्यावरील तेज आणि सौंदर्य कमी होते. अशावेळी तुम्ही त्वचारोगतज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घेऊन काही बेस्ट उपाय करू शकता. आज आपण जाणून घेऊयात चेहऱ्यावरील डाग दूर करण्यासाठी कोणते प्रभावी उपाय आपण करू शकतो.
हे प्रभावी उपाय करू शकता
फेसपॅक बनवायची सामग्री
- नालपामार
- केशर
- मंजिष्ठा पावडर
- लाल भात
- दूध
कृती
- वर उल्लेख केलेले सर्व साहित्य एका पॅनमध्ये उकळवा.
- यानंतर, या सर्व गोष्टी बारीक करून पेस्ट बनवा.
- ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि 1 तासानंतर चेहरा धुवा.
- आठवड्यातून 1-2 दिवस हा उपाय करा.
साहित्य
- लिंबाचा रस
- काकडीचा रस
कृती
- लिंबाचा रस आणि काकडीचा रस सारख्या प्रमाणात मिक्स करा
- आणि दररोज 20 मिनिटे चेहऱ्यावर लावा
- तसेच तुम्ही काकडीचा रस दह्यात मिसळून रोज चेहऱ्याला देखील लावू शकता.
साहित्य
- कोरफड
- हळद
- सफरचंद सायडर व्हिनेगर
- लिंबाचा रस
- मध
कृती
- एका वाटीमध्ये कोरफड, हळद, सफरचंद सायडर व्हिनेगर, लिंबाचा रस, मध घालून मिश्रण एकजीव करून घ्या .
- चेहऱ्यावर लावा.
- याने चेहऱ्यावरील डाग त्वरित निघून जातील.
कोरफड, हळद, सफरचंद सायडर व्हिनेगर, लिंबाचा रस, मध आणि आवश्यक तेले चेहऱ्यावर लावल्याने काळे डाग जलद आणि नैसर्गिकरित्या दूर होतील. तुमच्या स्किनकेअर रूटीनमध्ये या उपायांचा समावेश करून, तुम्ही तुमच्या त्वचेचे पोषण आणि उपचार करताना पिगमेंटेशन समस्या देखील सोडवू शकता.
हेही वाचा : Oily Skin Care : ऑयली स्किनसाठी वापरा चंदन पावडर
Edited By : Prachi Manjrekar