आजच्या धावपळीच्या जीवनात, रात्री उशिरापर्यंत जागणे आणि पुरेशी झोप न घेणे ही एक सामान्य समस्या बनली आहे. याचा थेट परिणाम आपल्या डोळ्यांवर होतो, ज्यामुळे डोळ्यांखाली काळी वर्तुळे आणि सूज येऊ लागते. डोळ्यांभोवतीची त्वचा खूप नाजूक असते, त्यामुळे त्यावर थकवा, ताण आणि वृद्धत्वाची लक्षणे लवकर दिसू लागतात. जर तुम्ही तुमच्या झोपण्याच्या पद्धती सुधारू शकत नसाल तर काही हरकत नाही! तुमच्या डोळ्यांची योग्य काळजी घेऊन तुम्ही काळी वर्तुळे आणि सूज कमी करू शकता. यासाठी डोळ्यांना हायड्रेट करणे सर्वात महत्वाचे आहे. यासाठी तुम्हाला महागड्या वस्तू खरेदी करण्याची देखील गरज नाही.डोळ्यांचा थकवा आणि काळी वर्तुळे दूर करण्यासाठी तुम्ही घरीच नैसर्गिक पौष्टिक थंडावा देणारा मास्क बनवू शकता आणि तो डोळ्यांना लावू शकता. जाणून घेऊयात अशा काही फेस मास्कविषयी.
1. गुलकंद आणि थंड दुधाचा आय मास्क
गुलकंद फक्त खाण्यासाठीच नाही तर त्वचेला थंडावा देण्यासाठी देखील चांगला आहे. डोळ्यांची जळजळ आणि थकवा दूर करण्यास गुलकंद मदत करतो. दुधात असलेले लॅक्टिक अॅसिड त्वचेला उजळवते आणि काळी वर्तुळे कमी करण्यास मदत करते.
कसा बनवायचा ?
2 चमचे थंड दुधात 1 चमचा गुलकंद मिसळा.
त्यात कापसाचा बोळा भिजवा आणि ते डोळ्यांवर ठेवा.
15-20 मिनिटांनी थंड पाण्याने धुवा.
2. गाजर आणि नारळपाण्याचा आय मास्क
गाजरांमध्ये असलेले व्हिटॅमिन ए आणि अँटीऑक्सिडंट्स त्वचेला पोषण देतात, तर नारळाचे पाणी त्वचेला थंड ठेवते आणि मॉइश्चरायझ करते.
कसा बनवायचा ?
1 गाजर किसून घ्या आणि त्यात 2 चमचे नारळपाणी घाला.
हे मिश्रण थंड करून डोळ्यांवर लावा. 15 मिनिटांनी थंड पाण्याने धुवा.
3. तुळशी आणि मधाचा आय मास्क
तुळशीमध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात, जे डोळ्यांची जळजळ कमी करण्यास मदत करतात, तर मध त्वचेला पोषण देते.
कसा बनवायचा ?
तुळशीची काही पाने बारीक करा आणि त्यात 1 चमचा मध घाला.
ते थोडे थंड होऊ द्या आणि डोळ्यांखाली लावा.
10-15 मिनिटांनी धुवा.
4. केशर आणि थंड दुधाचा आय मास्क
केशर त्याच्या अँटिऑक्सिडंट आणि त्वचा उजळवण्याच्या गुणधर्मांसाठी ओळखले जाते. थंड दुधात केशर मिसळून लावल्यास ते डोळ्यांना खोलवर पोषण देते आणि काळी वर्तुळे हलकी करण्यास मदत करते.
कसा बनवायचा ?
2 चमचे थंड दुधात 3-4 केशराचे धागे मिसळा आणि 10 मिनिटे भिजवू द्या.
या मिश्रणात कापसाचा बोळा बुडवा आणि तुमच्या बंद डोळ्यांवर ठेवा.
15-20 मिनिटे तसेच राहू द्या आणि नंतर थंड पाण्याने धुवा.
5. बडीशेप आणि गुलाबपाणी आय मास्क
डोळ्यांचा थकवा दूर करण्यासाठी बडीशेप खूप फायदेशीर आहे, कारण त्यात दाहक-विरोधी आणि थंड करण्याचे गुणधर्म आहेत. गुलाबजल डोळ्यांना त्वरित ताजेतवाने करण्याचे काम करते.
कसा बनवायचा ?
1 चमचा बडीशेप पाण्यात उकळा आणि थंड करा.
त्यात 1 चमचा गुलाबजल टाका आणि या मिश्रणात कापसाचे बोळे भिजवा आणि ते डोळ्यांवर ठेवा.
15 मिनिटांनी थंड पाण्याने धुवा.
हेही वाचा : Summer Fashion Tips : उन्हाळ्यासाठी ट्राय करा शॉर्ट कॉटन ड्रेसेस
Edited By – Tanvi Gundaye