ऑफिसमध्ये दिवसभर कॉम्प्युटरसमोर काम, घरी आल्यावर मोबाइलवर स्क्रोलिंग यामुळे लहान वयात चष्मा लागणे, डोळ्यांचे आजार अशा डोळ्यांच्या आरोग्याच्या समस्या वाढत आहेत. वाढत्या स्क्रीन टाइममुळे डोळ्यांवर ताण येण्याची समस्या आजकाल तर सामान्य झाली आहे. अशावेळी डोळ्यांना आराम देण्याची गरज असते. डोळे आपल्या शरीराचा अतिशय संवेदनशील भाग आहे. त्यामुळे डोळ्यांची काळजी घेणे आवश्यक आहे. त्यात थंडीचे दिवस सुरु असल्याने त्वचा कोरडी होण्याची समस्या डोळ्यांचे आरोग्य बिघडवण्यात भर घालत आहेत. अशा परिस्थितीत, तुम्ही डोळ्यांना थंडावा देण्यासाठी आय मास्क वापरू शकता. चला तर मग जाणून घेऊयात, होममेड आय मास्क कसे तयार करायचे,
केळ्याचा आय मास्क –
- केळ्याचा आय मास्क तयार करण्यासाठी एका बाउलमध्ये स्मॅश केलेले केळ, कच्चे दुध, कोरफडीचे जेल घालून मिक्स करुन घ्यावे.
- तयार पेस्ट डोळ्यांच्या खाली लावा आणि डोळे बंद करुन घ्या.
- कमीत कमी 15 ते 20 मिनिटे डोळे बंद ठेवा.
- 15 ते 20 मिनिटानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून घ्या.
टी बॅग आय मास्क –
- टी बॅग काही वेळ फ्रीजमध्ये ठेवा. यानंतर स्वच्छ पाण्यात बॅग्स बुडवा. बॅगेतील अतिरिक्त पाणी काढून टाका.
- आता या बॅग्स डोळ्यांवर ठेवा.
- या आय मास्कमुळे डोळ्यांवरील ताण नक्कीच कमी होईल.
गुलाब पाणी –
- गुलाब पाण्याचा आय मास्क तयार करण्यासाठी गुलाब पाण्यात कापूस भिजवून घ्या.
- कापूस डोळ्यांवर ठेवा.
- डोळ्यांना थंडावा मिळावा यासाठी तु्म्ही कापूस काही वेळ फ्रीजमध्ये ठेवू शकता.
तांदळाचा आय मास्क –
- तांदळ्याच्या पीठाचा आय मास्क वापरल्याने डोळ्यांखालील वर्तुळे कमी होतात. हा आय मास्क तयार करण्यासाठी
- एका वाटीत 1 चमचा तांदळाचे पीठ, 1 चमचा साय याची पेस्ट तयार करुन घ्या.
- तयार पेस्ट तुम्हाला डोळ्यांवर लावायची आहे.
- हा मास्क पूर्णपणे सुकविल्यावर डोळे स्वच्छ धुवून ध्यावेत.
कॉफी मास्क –
- कॉफीमुळे त्वचा उजळण्यासाठी मदत होते. तुम्ही डोळ्यांखालील काळी वर्तुळे कमी करण्यासाठी याचा वापर करू शकता.
- यासाठी 1 चमचा कॉफीमध्ये नारळाचे तेल टाकून त्याची पेस्ट तयार करुन घ्या.
- तयार पेस्ट डोळ्यांखालील लावा.
- या आय मास्कमुळे डोळ्यांना थंडावा तर मिळेलच शिवाय काळी वर्तुळे कमी होतील.
हेही पाहा –