आपला मेंदू जवळजवळ 80 टक्के माहिती डोळ्यांच्या माध्यमातून मिळवत असतो. त्यामुळेच डोळ्यांच्या आरोग्याची काळजी घेणे फार महत्त्वाचे असते. जर एखाद्याला चष्मा असेल तर त्याचा अर्थ असा होतो की, त्यांचे डोळे आधीच कमजोर आहेत अथवा डोळ्यांवर अधिक दबाव पडल्यामुळे दृष्टीवर त्याचा परिणाम झाला आहे. जर तुम्ही चष्मा लावत असाल तर याचा अर्थ असा होत नाही की, तुम्ही बेफिकिर रहाल. खरंतर चष्मा लावणाऱ्या लोकांनी पुढील काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. (Eye care tips)
युव्ही प्रोटेक्टेड चष्मा
जर तुम्ही चष्मा लावत असाल किंवा चष्मा बनवण्यास जाणार असाल तेव्हा युव्ही प्रोटेक्टेड चष्मा तयार करा. यामुळे सुर्याच्या हानिकारक किरणांपासून तुमच्या डोळ्यांना त्रास होणार नाही.
चेकअप शिवाय चष्मा तयार करू नका
डोळ्यांचे चेकअप केल्याशिवाय तुम्ही चष्मा तयार करू नका. प्रत्येक 6 महिन्यांनी डोळ्यांचे चेकअप जरुर करा.
डॉक्टरांकडून डोळ्यांचे चेकअप करुन घ्या
काही लोक पैशांची बचत करण्यासाठी चष्माच्या दुकानातून तो तयार करत नाही. त्यामुळे समस्या अधिक वाढल्या जातात. अशातच डॉक्टरांकडून डोळ्यांचे चेकअप करा.
दुसऱ्यांचा चष्मा वापरु नका
दुसऱ्यांचा चष्मा कधीच वापरू नका. यामुळे तुमचे डोळे खराब होऊ शकतात आणि इंन्फेक्शनचा धोका वाढू शकतो.
लेंन्स क्लीनर सॉल्यूशन
चष्मा घातल्यानंतर नेहमीच तो स्वच्छ करा. यासाठी लेंस क्लीनर सोल्यूशन आणि मऊ कापडाचा वापर करुन ते स्वच्छ करु शकता.
हेही वाचा- सनस्क्रिनच्या अतिवापराने होतील हे आजार