Sunday, December 15, 2024
Maharashtra Assembly Election 2024
घरमानिनीBeautyFace Shaving Tips : मैत्रिणींनो फेस शेविंग करण्याआधी घ्या ही खबरदारी

Face Shaving Tips : मैत्रिणींनो फेस शेविंग करण्याआधी घ्या ही खबरदारी

Subscribe

फेस शेव आता केवळ पुरुषांपर्यंतच सीमित राहिलेलं नाही. काही महिलादेखील आपल्या चेहऱ्यावरील केस काढून टाकण्यासाठी शेविंगचे अनेक पर्याय निवडत आहेत. सोशल मिडियावर अनेक इंफ्लुएन्सर्सदेखील फेशियल शेविंगला प्रोत्साहन देत आहेत. खरंतर याबाबत अनेक लोकांमध्ये गैरसमज आहेत.जसे की यामुळे केस मोठे आणि राठ उगवतात, चेहऱ्यावर काळपटपणा येऊ लागतो. आज आपण जाणून घेऊयात की फेस शेविंग करणं कितपत सुरक्षित आहे. आणि जर तुम्ही फेस शेव करणार असाल तर कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यायला हवं याबद्दल.

फेस शेव करण्याचे फायदे :

मुलायम त्वचा-
शेविंग केल्याने त्वचा मुलायम आणि गुळगुळीत होते.

- Advertisement -

मेकअप व्यवस्थित राहतो-
शेविंग केल्याने मेकअप चांगल्याप्रकारे चेहऱ्यावर बसतो. आणि दीर्घकाळासाठी टिकून राहतो.

इनग्रोन केसांपासून सुटका –
शेविंग केल्यामुळे इनग्रोन केसांच्या समस्येपासून सुटका मिळते.

- Advertisement -

स्किन केयर चांगली होते-
फेस शेव केल्यामुळे स्किन केयर प्रॉडक्टस अधिक चांगल्या पद्धतीने शोषून घेतल् जातात.

वेदना आणि ओरखडे निर्माण होत नाहीत-
फेस शेव केल्याने वॅक्सिंग किंवा थ्रेडिंगमुळे होणाऱ्या वेदना कमी होतात. कारण हे अगदी पेन-फ्री आहे. आणि यामुळे वेदना आणि ओरखडेही निर्माण होत नाहीत.

फेस शेविंग केल्याने होणारे नुकसान :

त्वचेची जळजळ –
जर योग्य पद्धतीने फेस शेविंग केलं गेलं नाही तर त्वचेची जळजळ होऊ लागते आणि त्वचा लालसरही होते.

इनग्रोन हेयर –
जर केसांना उलट्या दिशेने शेव केलं गेलं तर इनग्रोन हेयरची समस्या निर्माण होऊ शकते.

Face Shaving Tips:  Take these precautions before shaving your face

फेस शेविंग करताना काय काळजी घ्यावी ?

योग्य रेझरची निवड करा –
फेस शेविंग करण्यासाठी काही खास रेझर वापरले जातात. जे बाजारात तुम्हाला सहज उपलब्ध होऊ शकतात.फेस शेविंग करण्यासाठी त्याचाच वापर करावा. सोबतच तुमचा रेझर अगदीच जुना नसल्याची खात्री करून घ्या.

त्वचेला नरम ठेवते –
शेविंग करण्यापूर्वी चेहरा चांगल्या पद्धतीने स्वच्छ करून घ्या. आणि शेविंग क्रिम किंवा जेलचा वापर करा. यामुळे खरचटले जाण्याची शक्यता कमी होते.आणि त्वचा नरम राहते.

हलक्या हाताने शेविंग करा –
खूप जोरात दाबून शेविंग करू नका.

शेविंगनंतर मॉइश्चरायझर लावावे –
शेविंगनंतर त्वचेला मॉइश्चराइझ करणे खूप गरजेचे आहे.

फेस शेविंग सुरक्षित आहे ?

होय. फेस शेविंग पूर्णपणे सुरक्षित आहे, जर याला योग्यप्रकारे केलं गेलं तर. त्वचेशी संबंधी शेविंग करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या. विशेषत: जर अॅक्नेची समस्या असेल तर इन्फेक्शनची समस्या होऊ शकते.

या बाबींकडे द्या लक्ष :

शेविंगनंतर लगेच मेकअप करू नका –
शेविंग केल्यावर लगेचच चेहऱ्यावर मेकअप लावू नका.आणि कोणत्याही अॅक्टिव्ह स्किन केयर प्रॉडक्ट्सचा वापरही करू नका.

सनस्क्रीनचा वापर टाळा –
शेविंगनंतर सनस्क्रीनचा वापर करणे शक्यतो टाळा.

रेझर स्वच्छ ठेवा –
प्रत्येक वापरानंतर आणि प्रत्येक वापरापूर्वी रेझरला एखाद्या अल्कोहोल स्वॅबने नीट स्वच्छ करुन घ्या.

हेही वाचा : Oral Health Care : ओरल हेल्थ न सांभाळल्यास वाढतो या आजारांचा धोका


Edited By – Tanvi Gundaye

- Advertisment -

Manini