एक्सरसाइज केल्याने तुम्ही वजन मेंनटेन करू शकता. यामुळे तुमचे शरीर टोंड होते. मसल्स ही मजबूत होतात. मानसिक आरोग्य बूस्ट होते. म्हणजेच एकूणच तुमच्या आरोग्याला फायदा होतो. परंतु तुम्हाला माहितेय का, एक्सरसाइज केल्याने तुमची स्किन ग्लो होऊ शकतो.
जेव्हा तुम्ही एक्सरसाइज करता तेव्हा तुमचे ब्लड सर्कुलेशन सुरळीत होते. तुमचे हृदय पंप करण्यासाठी अधिक कुशल होते. त्यामुळे तुमची त्वचा कोशिकांपर्यंत ऑक्सिजन आणि महत्त्वपूर्ण तत्त्व व्यवस्थितीत पोहचतात. एक्सपर्ट्स असे म्हणतात की, जेव्हा तुम्ही एक्सरसाइज करता तेव्हा तुमची त्वचा आणि शरीरातून घाम निघून जातो. हे एक प्रकारे नैसर्गिर डिटॉक्सिफाइंग प्रक्रियेप्रमाणे काम करते. त्याचसोबत त्वचेवरील एक्स्ट्रा तेल आणि घाण निघून जाईल.
या व्यतिरिक्त एक्सरसाइज केल्याने तणावाचा स्तर कमी झाल्याने कोर्टिसोल सारखे तणाव निर्माण करणाऱ्या हार्मोनचे उत्पादन कमी होते. जे पिंपल्स आणि तेलाचा स्राव वाढवून तुमच्या त्वचेवर हानिकारक प्रभाव टाकू शकतात. त्याचसोबत कोलेजेनचे उत्पादन वाढले जाते. अशातच सुरकुत्या आणि फाइन लाइन कमी करण्यास मदत होते. परिणामी तुम्ही तरुण दिसता. तसेच झोपेची गुणवत्ता ही सुधारली जाते.
हेही वाचा- हिप्स टोन करण्यासाठी करा ‘या’ एक्सरसाइज