Tuesday, March 18, 2025
HomeमानिनीBeauty Tips : चेहऱ्यावर फेशियल वॅक्स करणे योग्य आहे का ?

Beauty Tips : चेहऱ्यावर फेशियल वॅक्स करणे योग्य आहे का ?

Subscribe

आपला चेहरा सुंदर आणि ग्लोइंग दिसण्यासाठी आपण अनेक उपाय करत असतो . स्किनकेर पासून ते अनेक प्रॉडक्ट्स देखील वापरतो. बऱ्याचदा सर्व उपाय करून सुद्धा आपल्या त्वचेवरील डाग किंवा मुरुम यांच्या समस्या काही कमी होत नाही अशावेळी बरेच लोक चेहऱ्यावर फेशियल वॅक्स करतात. परंतु तुम्हाला माहिती आहे का फेशियल वॅक्सिंग त्वचेच्या आरोग्यासाठी चांगले आहे की नाही? जर तुमच्या मनात हाच प्रश्न येत असेल तर आज आपण या लेखातून जाणून घेऊयात चेहऱ्यावर फेशियल वॅक्स करणे योग्य आहे का ?

ब्युटी एक्सपर्टचा सल्ला घ्या

चेहऱ्यावर फेशियल वॅक्स करण्याआधी ब्युटी एक्सपर्टचा सल्ला घ्या. अनेक मुली या चेहऱ्यावर फेशियल वॅक्स करतात. फेशियल वॅक्स चेहऱ्यावरील बारीक केस काढून चेहरा सुंदर बनवण्यास मदत करते. ज्यामुळे चेहरा स्वच्छ आणि गोरा दिसतो. एवढेच नाही तर फेशियल वॅक्सिंग केल्यानंतर चेहऱ्याची त्वचा मऊ आणि चांगली होते.

चेहऱ्यावरील टॅनिंग दूर होते

चेहऱ्यावर फेशियल वॅक्स केल्याने तुमच्या चेहऱ्यावरील केस निघून जातात. फेशियल वॅक्स तुमच्या चेहऱ्यावरील टॅनिंग काढून टाकण्यास खूप मदत करते. परंतु या सर्व फायद्यांव्यतिरिक्त. तुम्हाला फेशियल वॅक्सचे काही तोटे देखील माहिती असणे गरजेचं आहे.

फेशियल वॅक्सचे तोटे

फेशियल वॅक्स तुमच्या चेहऱ्यावरील केस काढून टाकते परंतु काही मुलींच्या संवेदनशील त्वचेमुळे त्वचेवर जळजळ होण्याचा धोकाही वाढतो. इतकेच नाही तर चेहऱ्यावर लाल मुरुमे, पुरळ, लालसरपणा यांसारख्या समस्याही वाढू लागतात. इतकेच नाही तर फेशियल वॅक्स केल्यानंतर काही मुलींना चेहऱ्यावर खाज सुटणे तसेच अॅलर्जीचा अनुभव येऊ शकतो.

स्किन टाइपनुसार निवडा वॅक्स

आपली चेहऱ्याची त्वचा ही सर्वात नाजूक असते. अशा परिस्थितीत, तुम्ही तुमचा चेहरा वॅक्स करताना काळजी घेतली पाहिजे.कारण कधीकधी चुकीच्या वॅक्सिंगमुळे पिग्मेंटेशन आणि त्वचेची ऍलर्जी होण्याचा धोका देखील वाढतो.ज्यामुळे चेहरा तेलकट आणि मुरुमांनी भरलेला दिसू लागतो.ब्युटी एक्सपर्टच्या मते फेशियल वॅक्स करण्यापूर्वी स्किन टाइपनुसार वॅक्स निवडणे खूप गरजेचे असते. स्किन टाइपनुसार वॅक्स केले नाही तर भविष्यात अनेक त्वचेच्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे योग्य वॅक्सची निवड करावी.

हेही वाचा : Beauty Tips : ग्लोइंग स्किनसाठी मध आणि सीड्स


Edited By : Prachi Manjrekar

Manini