घरलाईफस्टाईलFact Check : मासिक पाळी दरम्यान कोरोनाची लस घेणं सुरक्षित की धोक्याचे...

Fact Check : मासिक पाळी दरम्यान कोरोनाची लस घेणं सुरक्षित की धोक्याचे ?

Subscribe

मासिक पाळी दरम्यान कमी होणार्‍या रोगप्रतिकारा शक्ती वर होतो यांच्या परस्पर संबधना कुठलाही शास्त्रीय आधार नाही

जगभरामध्ये कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली आहे. लस घेऊन सुद्धा कोरोना होत असल्याने लोकांच्या मनात लसीकरणा बाबत संभ्रम निर्माण झाला आहे . कोरोनाची लस घ्यावी की नाही याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. अशातच सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत आहे. पोस्टमधे महिलांनी मासिक पाळीदरम्यान लस घेऊ नये अशी माहिती देण्यात आली आहे.
स्त्रियांना येणार्‍या मासिक पाळी बद्दल आधीच काही लोकांनी पोकळ संकल्पना तयार करून ठेवल्या आहेत आणि आता सोशल मीडिया द्वारे एक नवीन अफवा लोकांमध्ये पसरत आहे. तसेच या सर्व संकल्पनान आणि अफवांना काही माणसे बळी सुद्धा पडत आहेत. नुकतच सोशल मीडियाचा वापर करून मासिक पळीच्या काळात कोरोनाची लस घेण असुरक्षित आहे अशी अफवा पसरवली जात आहे. समाजामध्ये दिशाभूल करण्यासाठी खोटी माहिती पसरवली जात आहे. व्हायरल झालेल्या पोस्ट मध्ये ” मासिक पाळीच्या काळात स्त्रियांची प्रतिकारशक्ती कमी असते, त्यामुळे मासिक पाळीच्या पाच दिवस आधी आणि पाच दिवस नंतर लस घेऊ नये.” दरम्यान या माहितीबद्दल डॉक्टरांकडून विचारपूस केली असता मासिक पाळीचा आणि कोरोना लसीकरणाचा काहीही सबंध नाही असे डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे.

- Advertisement -

मासिक पाळी दरम्यान १८ वर्षापुढील स्त्रिया कोरोना लस घेऊ शकतात. लसीकरणाचा रोगप्रतिकार शक्ती सोबत काहीही संबध नाही लसीकरण करणे पुर्णपणे सुरक्षित आहे. इतकेच नाही तर गरोदर स्त्रियांना सुद्धा डॉक्टरांशी सल्ला घेऊन लसीकरण करण्यास काहीही हरकत नाही. संपूर्ण भारतीय बनावटीची असलेली लस सगळ्यांसाठी सुरक्षित आहे असा खुलासा डॉक्टरांनी केला आहे.महाराष्ट्र राज्य सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी व्हायरल होणार्‍या संदेशा बाबत स्पष्टीकरण देत म्हंटले आहे ” आपल्याकडे मासिक पाळीबाबत अनेक अंधश्रद्धा आहेत आणि त्यातूनच अशा चुकीच्या पोस्ट व्हायरल होत आहेत. मात्र कोरोना लसीकरणाचा परिणाम आणि मासिक पाळी दरम्यान कमी होणार्‍या रोगप्रतिकारा शक्ती वर होतो यांच्या परस्पर संबधना कुठलाही शास्त्रीय आधार नाही. सर्व स्त्रियांनी लसीकरण करावे तसेच मासिक पाळीच्या काळातही लस घ्यावी . कोणत्याही प्रकारच्या खोट्या तसेच चुकीच्या महितीला बळी पडू नका.
सध्याचा जमाना हा सोशल मीडियाच्या आहारी गेला असल्याचे आपण पाहतो. कोणतीही घटना असो माहिती असो वार्‍याच्या वेगाने संपूर्ण देशात पसरते पण कोणत्याही प्रकारची खातरजमा न बाळगता काही लोक खोटी माहिती पुढे शेअर करतात. तर अशा खोट्या महितीला बळी न पडता योग्य माहिती पुढे शेअर करावी अन्यथा अनेकांसाठी हे नुकसानदायक ठरू शकते.


हे हि वाचा –  जास्त जोखीम असलेल्या गर्भवतींनी अशी घ्यावी काळजी

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -