Saturday, March 15, 2025
HomeमानिनीWomens Day 2025 : महिला शक्तीचे प्रतिक असणारी ऐतिहासिक स्थळे

Womens Day 2025 : महिला शक्तीचे प्रतिक असणारी ऐतिहासिक स्थळे

Subscribe

आपला देश अद्वितीय संस्कृती, परंपरा आणि ऐतिहासिक स्थळांसाठी जगभरात ओळखला जातो. विविधतेने नटलेल्या या देशात अनेक गोष्टी प्रसिद्ध आहेत आणि त्या पाहण्यासाठी जगभरातील लोक येतात. देशातील विविध पदार्थ ते ऐतिहासिक स्थळे अद्भुत आहेत. आज सर्वत्र जागतिक महिला दिन साजरा होत आहे. आजच्या महिलादिनानिमित्त जाणून घेऊयात देशातील अशी 5 ऐतिहासिक स्थळे, जी महिला शासकांनी बांधली आहेत.

इतिमाद-उद-दौला आग्रा (Itmad-ud-Daula)

आग्रा येथे एक छोटा ताजमहाल आहे. याला इतिहासात एक विशेष स्थान आहे. ही कबर एका मुलीने तिच्या वडिलांसाठी बांधली होती. सम्राट जहांगीरची पत्नी महाराणी नूरजहॉं यांनी 1622 ते 1628 दरम्यान वडिलांच्या स्मरणार्थ हे उत्तम संगमरवरी समाधीस्थळ बांधले होते.

हुमायूनचा मकबरा, नवी दिल्ली (Humayun’s Tomb)

देशातील ऐतिहासिक स्थळांपैकी एक असणारा हुमायुनचा मकबरा एक आहे. हुमायुनचा मकबरा 1565 ते 1572 दरम्यान बांधण्यात आला आहे. पर्शियन वास्तूकलेचा मिश्रण दाखवणारा हा मकबरा पत्नी हमीदा बानु बेगम यांनी बांधला होता. ही देशातील पहिली बाग-समाधी आहे. या मकबऱ्यात हुमायुनसह अनेक मुघल शासकांचे अवशेष आहेत.

विरूपक्ष मंदिर, पट्टडकल (Virupaksh temple)

विरूपक्ष मंदिर विक्रमादित्य द्वितीय यांची पत्नी लोकमहादेवी यांनी 740 मध्ये त्यांच्या पतीच्या पल्लवांवर विजय साजरा करण्यासाठी बांधले होते. हे मंदिर कर्नाटकातील पट्टडकल येथे आहे. तुम्हाला जर द्रविड वास्तुकलेचा उत्तम नमुना पाहायचा असल्यास येथे आवर्जुन जावे.

राणी की वाव, गुजरात (Rani Ki vav)

गुजरातमधील पाटण येथे सोलंकी राजवंशातील राजा भीमदेव प्रथम याच्या पत्नी उदयमती यांनी राणी की वाव बांधली होती. अद्वितीय वास्तुकलेसाठी हे मंदिर ओळखले जाते. 1063 मध्ये हे बांधण्यात आले आहे.

लाल दरवाजा मशीद, जौनपुर

जौनपुर येथील लाल दरवाजा मशीद 1447 मध्ये बीबी राजे यांनी बांधली होती. बीबी राजे ही सुलतान महमूद शार्कीची राणी होती. ही मशीद संत सय्यद अली दाऊद यांनी समर्पित आहे.

 

 

 

हेही पाहा –

Manini