महाशिवरात्रीचा सण हिंदू धर्मात खूप मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत. शिवभक्तांसाठी हा एक महत्त्वाचा धार्मिक सण असतो. या दिवशी संपूर्ण देश शिवाच्या भक्तीत तल्लीन झालेला दिसतो. वर्षभर शिवभक्त या सणाची आतुरतेने वाट पहातात. यंदा 26 फेब्रुवारी रोजी साजरी होणार आहे. या दिवशी भक्तगण विविध मंदिरात शिवाच्या दर्शनासाठी गर्दी करताना दिसतात. आज आम्ही तुम्हाला महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध असणारे मंदिरे सांगत आहोत. या मंदिरात महाशिवरात्रीला नक्कीच शिवाचे दर्शन घेण्यासाठी जाऊ शकतात.
भुलेश्वर मंदिर – पुणे
पुण्यातील माळशिरसजवळील एका टेकडीवर वसलेले भुलेश्वर मंदिर एक प्राचीन मंदिर आहे. या मंदिराच्या गर्भगृहात पाच शिवलिंगे आहेत. ही शिवलिंगे केवळ सुर्यप्रकाशातच दिसतात. या मंदिरात लक्ष्मी देवी, भगवान विष्णू देखील आहेत.
महादेव मंदिर – अंबरनाथ
अंबरनाथचे हे महदेव मंदिर सर्वात प्राचीन मंदिर आहे. शिलाहार राज घराण्यातील माम्वाणी राजाच्या काळात इ.स.1060 मध्ये हे मंदिर पू्र्ण झाल्याचा उल्लेख मंदिरावरील शिलालेखावर आढळतो.
उमाळा मंदिर – जळगाव औरंगाबाद महामार्ग
जळगाव- औरंगाबाद महामार्गावर असलेल्या उमाळे गावाच्या प्रथमदर्शनी भागात हे शिवाचे सुंदर मंदिर आहे. येथे तुम्हाला वैशिष्टपूर्ण अशी शिवलिंग पाहता येईल. उमाळा मंदिर जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते.
उनपदेव महादेव मंदिर –
सातपुडा पर्वतरांगेच्या पायथ्याशी असलेले उनपदेव महादेव मंदिरात तुम्ही महाशिवरात्रीला जाऊ शकता. या मंदिराचा प्रमुख झरा हा गरम पाण्याचा झरा आहे. महाशिवरात्रीला येथे महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून भक्तगण शिवाचे दर्शन घेण्यास येतात.
कोपेश्वर मंदिर – कोल्हापूर
कोल्हापुरातील कृष्णा नदीच्या तीरावर वसलेले खिद्रापूरमध्ये हे मंदिर आहे. येथे महाशिवरात्रीला प्रचंड गर्दी असते.
मार्लेश्वर मंदिर –
रत्नागिरीतील मार्लेश्वर मंदिर शिवाचे सूप्रसिद्ध मंदिर आहे. हे मंदिर देवरूखपासून 17 किमी अंतरावर आहे.
अमृतेश्वर मंदिर – अहमदनगर
अहमदनगर येथील अमृतेश्वर मंदिर हेमाडपंथी स्थापत्यशैलीत आहे. रतनवाडी येथे हे मंदिर स्थित आहे.
हेही पाहा –