जीन्स हे एक असं आउटफिट आहे जे प्रत्येक वयाच्या आणि आकाराच्या महिलेला सूट होतं. कॉलेजवयीन मुली आणि ऑफिसला जाणाऱ्या तरुणींकडे तीन – चार जीन्स तर हमखास असतातच. ट्रेडिशनलपासून ते वेस्टर्नपर्यंत अनेक प्रकारचे टॉप्स यावर सहज मॅच करता येतात. तुम्हाला बाजारात अनेक प्रकारचे टॉप मिळतील जे तुम्ही जीन्स किंवा पँट स्टाइल सलवारसोबत घालू शकता. पण, जर तुम्ही व्हाइट जीन्स घातली असेल आणि तुम्हाला अप्रतिम लूक हवा असेल तर तुम्ही फ्रॉक स्टाइल टॉप निवडू शकता. या लेखात, आपण जाणून घेऊयात अशा काही लेटेस्ट फ्रॉक स्टाइल डिझाइनविषयी. जे तुमचा ऑफिससवेअर लूक किंवा कॉलेज गोइंग लूक अधिकच स्मार्ट करू शकतील.
प्रिंटेड टॉप :

पांढऱ्या जीन्ससह तुम्ही या प्रकारचा प्रिंटेड फ्रॉक स्टाइल टॉप निवडू शकता . नवीन आणि स्टायलिश लूक मिळवण्यासाठी हा ऑप्शन बेस्ट आहे. तुम्हाला अनेक नेक डिझाईन्स आणि रंग या प्रकारच्या टॉप स्टाइलमध्ये तुम्हाला उपलब्ध होऊ शकतात. स्लीव्हलेस, पफ स्लीव्हस, फुल स्लीव्हस असे पर्यायही यात उपलब्ध आहेत. हा टॉप तुम्ही ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही ठिकाणांहून 300 ते 400 रुपये किमतीत खरेदी करू शकता.
फ्लोरल प्रिंट टॉप :

तुम्ही या प्रकारच्या फ्लोरल प्रिंट टॉपला व्हाईट जीन्ससोबत स्टाईलही करू शकता. नवीन लूक मिळविण्यासाठी या प्रकारचा टॉप सर्वोत्तम आहे. हा टॉप तुम्हाला अनेक नेक डिझाइन्समध्ये तसेच स्लीव्हलेस आणि पफ स्लीव्हजमध्ये मिळेल. तुम्ही हा टॉप 300 ते 500 रुपये किमतीत खरेदी करून स्टाइल करू शकता.आउटिंग किंवा ऑफिसमध्ये तुम्ही या प्रकारचा टॉप फ्लोरल प्रिंटमध्ये घालू शकता. या टॉपमधील तुमचा लूक खूप वेगळा आणि सुंदर दिसेल.
भरतकाम वर्क केलेले टॉप :

तुम्ही 3/4 स्लीव्हज आणि एम्ब्रॉयडरी वर्क असलेले टॉप हा प्रकार देखील निवडू शकता. पांढऱ्या जीन्ससोबत स्टाईल करण्यासाठी हा टॉप उत्तम आहे आणि हा टॉप स्टाइल केल्यानंतर तुम्ही सुंदर दिसाल. तुम्ही या प्रकारचा टॉप 500 रुपयांना खरेदी करू शकता. जर तुम्हाला ट्रेडिशनल लूक हवा असेल तर हा टॉप तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन ठरू शकतो.
हेही वाचा : White Tea Benefits : आयुर्वेदिक गुणांनी युक्त व्हाइट टी
Edited By – Tanvi Gundaye