सुंदर आणि आकर्षक दिसायला सगळ्यांनाच आवडतं. मात्र त्यासाठी पुरुषांच्या तुलनेत महिला जास्त अलर्ट असतात. चारचौघात आपण हटके कसं दिसू असा त्यांचा प्रयत्न असतो. पण स्थूल किंवा प्लस साईज महिला याबाबत विशेष काळजी घेताना दिसतात. बऱ्याचवेळा महागडी साडी किंवा ड्रेस घालूनही त्यांना तो शोभून दिसत नाही. यामुळे त्या हिरमुसतात. जर तुमच्याबरोबरही असचं होत असेल तर ही माहीती तुमच्यासाठी नक्की उपयोगी ठरेल.
फॅशनच्या दुनियेत स्लिम, फेयर, सेक्सी, स्मार्ट दिसणे जरी महत्वाचे असले तरी जर तुमच्यात आत्मविश्वास नसेल तर तुमच्या स्लिम आणि उजळ दिसण्याला काही महत्व नसते. कारण जर तुमचं वजन कमी किंवा जास्त असेल आणि त्याची कारणे वेगवेगळी जरी असली तरी तुम्ही स्व:तला कसं प्रेझेंट करता हे महत्वाचे आहे. यामुळे वजनाचा न्यूनगंड न बाळगता तुम्ही फक्त काही गोष्टींवर फोकस करुन देखील हटके दिसू शकता. म्हणूनच फॅशन इंडस्ट्रीमध्ये प्लस साईजच्या महिलांसाठीही तितकेच पर्याय आहेत जेवढे सडपातळ महिलांसाठी आहेत. त्यामुळे ओव्हर साइज स्त्रिया स्लिम महिलांइतक्याच स्टायलिश दिसू शकतात.
काय करावे?
कॉपी
सगळ्याच स्थूल महिलांचा बॉडी शेप एकसमान नसतो. म्हणूनच वेगवेगळ्या फिटींगचे कपड्यात प्रत्येक जण वेगळी दिसते. यामुळे अमकीने त्या रंगाचे किंवा स्टाईलचा ड्रेस किंवा साडी नेसली आहे. ती तिला शोभून दिसते मग मला पण दिसेल असा अट्टाहास कधीही करू नये. कारण महिला यामध्येच गफलत करतात. एख्याद्या टिव्ही सिरियलमध्ये अभिनेत्रीने नेसलेली साडी किंवा ड्रेस बघून तसाच घेतात. पण तो त्या अभिनेत्रीवर जितका खुलून दिसत होता तेवढा तो तुमच्यावर दिसेलच असे नाही. कारण तिचा रंग तिचा बॉडी शेप ,उंची तुमच्यापेक्षा कदाचित वेगळी आहे. त्यामुळे कोणाकडे पाहून कधीही आउटफिट निवडू नका. दुसऱ्याचे कॉपी कॅट बनू नका.
पोट लपवण्याचा प्रयत्न करू नका
ओव्हर साइज महिला प्रामुख्याने असे कपडे निवडतात ज्यामध्ये त्यांचे पोट दिसणार नाही. पण फॅशन एक्सपर्टच्या मते महिलांना पोट लपवण्याची गरज नाही. कारण वजन लपवता येत नसले तरी ते कमी दाखवता येतं. यासाठी प्लस साईज, स्थूल महिलांनी सैल, ढगळे कपडे न घालता फिटिंगचे कपडे वापरावेत.
अंडरगारमेंट्स
हल्ली अनेक प्रकारचे स्टायलिस्ट अंडरगारमेंट्स बाजारात उपलब्ध आहेत. यातील काही अंडरगारमेंट्स बॉडी शेपिंगचे काम करतात. त्यामुळे चांगल्या ब्रँडचे आणि फिटिंगचे अंडरगारमेंट्स वापरावेत.
क्रॉप टॉप
बऱ्याच स्थूल महिलांवर क्रॉप टॉप खूप स्टायलिश दिसतात. हे टॉप फिटेड स्कर्ट किंवा पँटवरही तुम्ही ट्राय करू शकता.
मिनी ड्रेसेस
स्थूल महिलांना मिनी ड्रेसेस शोभून दिसतात. यात मिनि स्कर्टवर विशेषतः शॉर्ट शर्ट चांगले दिसतात. त्यामुळे तुमच्या लूकमध्ये थोडासा बदल हवा असेल तर तुम्ही स्टायलिश शर्ट ड्रेस ट्राय करू शकता.
फॅब्रिक
स्थूल महिलांनी कपडे निवडताना त्याचे फॅब्रिक्स आधी चेक करावे. कारण जाड प्रकारचे फॅब्रिकच्या साड्या किंवा ड्रेस घातल्यास त्या अधिक स्थूल दिसू शकतात. त्यामुळे
फिट, फ्लेअर ड्रेस
फिट आणि फ्लेअर कपडे ट्रेंडमद्ये आहेत. यामुळे स्थूल महिलांनीही हे ड्रेसेस नक्की ट्राय करावे त्यामुळे ट्रेंडी आणि स्टायलिश लूक मिळतो.