Saturday, March 15, 2025
HomeमानिनीFashion Tips for Pregnant Woman : प्रेग्नंट महिलांसाठी साडी ड्रेपिंग टिप्स

Fashion Tips for Pregnant Woman : प्रेग्नंट महिलांसाठी साडी ड्रेपिंग टिप्स

Subscribe

साडी ही अनेक महिलांकरता जीव की प्राण असते. प्रत्येक भारतीय महिला सणसमारंभाच्या निमित्ताने किंवा कार्यक्रमाच्या निमित्ताने साडी नेसते. साडीमध्ये पारंपरिक काठापदराच्या साडीपासून ते हलक्याफुलक्या मॉडर्न नेट साडीपर्यंत अनेक प्रकार उपलब्ध आहेत. पण अनेकदा महिलांमध्ये असा समज असतो की साडी नेसल्याने आपण सुंदर तर दिसू शकतो पण काहीवेळेस ती कम्फर्टेबल नसते. विशेषतः गरोदरपणाच्या काळात.  अनेक गर्भवती महिला साड्या नेसणे बंद करतात कारण त्यांना वाटते की साडी त्यांच्या लाइफस्टाइलसाठी योग्य नाही. परंतु तसे नाही. कारण जर तुम्ही साडी व्यवस्थित नेसली तर तुम्हाला कम्फर्टेबल वाटण्यासोबतच तुम्ही स्टायलिश दिसू शकता. गरोदरपणात महिलांच्या मनात एकच प्रश्न निर्माण होतो तो म्हणजे परकर कुठे बांधावा?  पोटाच्या वर, खाली की मध्यभागी. आज आपण जाणून घेऊयात गरोदर स्त्रियांसाठी साडी नेसण्याच्या काही खास टिप्स.

साडी नेसताना परकर कुठे बांधावा ?

जर तुम्ही परकर खाली बांधला तर तो खाली लटकू लागतो. जर तुम्ही मध्ये बांधला तर बसताना साडी वर सरकते. अशा परिस्थितीत, तुम्ही परकर वरच्या बाजूला म्हणजेच जिथे अरुंद भाग आहे तिथे बांधायला हवा. जर हा भाग आधीच वर असेल तर साडी जास्त वर जाऊ शकणार नाही. आणि परकर अरुंद भागात बांधल्याने साडी खाली देखील येणार नाही.

परकर घट्ट बांधावा की सैलसर ?

आता घट्ट किंवा सैल परकर बांधण्याआधी सर्वप्रथम हे लक्षात ठेवा की गरोदरपणात तुम्ही जड साडी घालणे टाळावे. कारण जड साडीचे कापड तोलणे परकरला जड जाऊ शकते. याशिवाय, परकर घट्ट बांधू नका, जर तुम्ही असे केले तर स्ट्रेच मार्क्सची समस्या उद्भवू शकते. परकर दोन बोटांचे अंतर राहील इतका सैल असावा.

हेही वाचा : Fashion Tips : सिम्पल ब्लाउजला द्या डिझायनर लूक


Edited By – Tanvi Gundaye

Manini