Thursday, December 7, 2023
घरमानिनीFashionFashion Tips : सोन्याच्या दागिन्यांची काळजी कशी घ्याल?

Fashion Tips : सोन्याच्या दागिन्यांची काळजी कशी घ्याल?

Subscribe

काळानुसार दागिन्यांचे स्वरुप बदलले असले तरीही सोन्याच्या दागिन्यांची महिलांमध्ये असणारी आवड आजही तितकीच आहे. लग्न समारंभात किंवा काही कार्यक्रमात आपण सोन्याचे दागिने वापरतो. पण नंतर मात्र घाईगडबडीत कपाटात तसेच ठेऊन देतात. सण-समारंभ सोडले तर या दागिन्यांचा वापर होतच नाही. काही सोप्या गोष्टी केल्यास हे दागिने कायम चमकदार दिसून आपण उठून दिसू शकतो. यासाठी आज आम्ही तुम्हाला काही खास टिप्स सांगणार आहोत.

सोन्याच्या दागिन्यांची अशी घ्या काळजी

  • सोन्याचे दागिने वापरताना ते सतत रसायनांच्या संपर्कात येणार नाही याची काळजी घ्यावी. अनेकदा आपण अंगावर दागिने घालूनच आंघोळीला जातो किंवा धुणी भांडी करत असतो. अशावेळी दागिने साबण किंवा शॅम्पूच्या संपर्कात येतात, यामुळे तुमच्या सोन्यावर असलेली झळाळी कमी होऊ शकते.

Follow This Guide To Take Care of Your Gold Jewelry Like a Pro! – Timeless Indian Jewelry | Aurus

- Advertisement -
  • सोन्याचे दागिने इतर कोणत्याही दागिन्यांसोबत ठेवू नका. शक्यतो प्रत्येक दागिन्यांसाठी वेगळा बॉक्स ठेवा. मोत्याचे, चांदीचे आणि इतर खोट्या दागिन्यांच्या संपर्कात सोन्याचे दागिने आल्यास त्याची चकाकी कमी होते.
  • सोन्याचे दागिने नेहमी मऊ सुती कपड्यात बांधून वेगळे ठेवावे.
  • कोमट पाण्यात दागिने 15 मिनिटे बुडवून ठेवा. त्यामुळे त्यात साचलेले धुलीकण निघून जातील.

How to Clean Gold Jewelry at Home - HubPages

  • दागिने साफ करताना छोटा सॉफ्ट ब्रश वापरा.पण हा ब्रश हळूवारपणे फिरेल याची काळजी घ्या.
  • दागिन्यांमध्ये मौल्यवान खडे असतील तर जास्त गरम पाणी किंवा उकळत्या पाण्याचा अजिबात वापर करु नका. पाण्याच्या उच्च तापमानामुळे दागिन्याला तडे जाण्याची शक्यता असते.
  • दागिने वापरून झाले की कापसाच्या बोळ्याने किंवा कपड्याने ते पुसून घ्या आणि कोरडे करून झाल्यानंतरच ते बॉक्समध्ये भरून ठेवा.

हेही वाचा :

कानाचे छिद्र मोठे असेल तर ‘या’ टिप्स करा फॉलो

- Advertisment -

Manini