मुली त्यांचा लूक वेगळा आणि सुंदर दिसण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे आउटफिट ट्राय करत असतात, अशा परिस्थितीत काही मुली त्यांच्या कपड्यांबद्दल खूप चिंतेत असतात. त्यांच्या मनात नेहमीच एक प्रश्न असतो की त्यांनी असे कोणते कपडे घालावेत ज्यामुळे त्या इतरांपेक्षा वेगळ्या दिसतील. जर तुमच्या मनात हाच प्रश्न येत असेल तर आज जाणून घेऊयात अशा काही अद्भुत टॉप्सबद्दल. जे तुम्ही बेल बॉटम्ससह घालू शकता आणि स्वत:ला एक स्टायलिश लूक देऊ शकता.
ऑफ-शोल्डर मेश क्रॉप फिटेड टॉप

जर तुम्ही कॉलेजला जात असाल आणि रोज तेच कपडे घालण्याचा कंटाळा येत असेल, तर तुम्ही बेल बॉटम जीन्ससोबत ऑफ-शोल्डर मेश क्रॉप फिटेड टॉप घालू शकता. कम्फर्टेबल असण्यासोबतच हे टॉप एक स्टायलिश लूक देखील देतात. तुम्ही हा टॉप कोणत्याही पार्टी किंवा आउटिंगसाठी ट्राय करू शकता. ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही प्रकारे हा टॉप तुम्हाला खरेदी करता येईल.
बेल स्लीव्ह क्रॉप टॉप

जर तुम्हाला नेहमीपेक्षा थोडं वेगळं दिसायचं असेल आणि तेच कपडे घालण्याचा कंटाळा येत असेल, तर बेल स्लीव्ह क्रॉप टॉप तुमच्यासाठी बेस्ट पर्याय असू शकतो. हा टॉप तुम्हाला एक सुंदर लूक देण्यास खूप मदत करेल. हा टॉप 400 ते 500 रूपयांपर्यंत तु्म्ही खरेदी करू शकता.
फुलांचा फुल स्लीव्हज टॉप

जर तुम्हाला एकसारखा टॉप घालायचा नसेल आणि ऑफिस किंवा कॉलेजमध्ये स्टायलिश दिसायला जायचे असेल, तर तुम्ही हा निळा फुलांचा फुल स्लीव्हज टॉप पांढऱ्या रंगाच्या बेल बॉटम जीन्ससोबत कॅरी करू शकता. हा टॉप घालून तुम्ही कोणत्याही ऑफिस पार्टीला किंवा कॉलेजलाही जाऊ शकता. या टॉपसोबत तुम्ही स्टड इअररिंग्ज देखील घालू शकता. तुम्ही असा टॉप बाजारातून खरेदी करू शकता किंवा तो ऑनलाइन ऑर्डर देखील करू शकता.
स्वीटहार्ट नेक पफ स्लीव्ह टॉप

जर तुम्ही तुमच्या मित्रांसोबत बाहेर जात असाल किंवा कुटुंबासोबत ट्रिपला जात असाल, तर तुम्ही हा गुलाबी रंगाचा फ्लोरल प्रिंट असलेला स्वीटहार्ट नेक पफ स्लीव्ह टॉप घालू शकता. यामध्ये तुम्हाला अनेक प्रकारच्या फ्लोरल प्रिंट्स मिळू शकतील. तुम्ही हे टॉप ऑनलाइन खरेदी करू शकता. 250 ते 500 च्या रेंजमध्ये तुम्हाला हा टॉप सहज मिळू शकेल.
हेही वाचा : Gardening Tips : गुलाब फुलतील टवटवीत या टिप्सने
Edited By – Tanvi Gundaye