कोणताही सणसमारंभ म्हटला की त्यासाठी वेगवेगळे आऊटफिट्स हे आलेच. प्रसंगानुरूप पारंपरिक कपड्यांपासून ते वेस्टर्न आऊटफिटपर्यंत अनेक कपडे या खास प्रसंगांसाठी परिधान केले जातात. या पेहरावाला साजेशा दागिन्यांचीही मग हमखास खरेदी केली जाते. दागिने, कपडे यांबरोबरीनेच आणखी एक गोष्टही महत्त्वाची असते ती म्हणजे सोबत घेतली जाणारी बॅग. जेव्हा आपण कधी बाहेर फिरायला जातो तेव्हा सामान ठेवण्यासाठी एक बॅग नेहमीच सोबत ठेवतो. परंतु ही बॅग प्रत्येक आऊटफिटवर सुंदर दिसेलच असे नाही. त्यामुळे आपल्या आऊटफिटची शोभाही कधीकधी जाऊ शकते. आणि आपला खास लूक बिघडू शकतो. अशा स्थितीत तुम्ही काही पोटली बॅग्स वापरून पाहू शकता. यासाठीच जाणून घेऊयात काही पोटली बॅग्जच्या निरनिराळ्या डिझाइन आणि प्रकारांविषयी.
जरीची एम्ब्रॉयडरी वर्क असणारी पोटली बॅग :

तुम्ही जरी वर्क असलेली पोटली बॅग कॅरी करू शकता. या प्रकारच्या बॅग्ज भारतीय पोशाखांसोबत खूप छान दिसतात. तसेच, त्यांना कॅरी केल्यानंतर लूक पूर्णपणे बदलतो. या संपूर्ण बॅगमध्ये हेवी एम्ब्रॉयडरी वर्क असलेली डिझाईन असते. त्याच्या हँडल्सवर मण्यांचे काम उपलब्ध असते. त्यामुळे बॅग छान आणि आकर्षक दिसते. शिवाय यामुळे लूकही सुंदर दिसतो.
फ्रील डिझाइन बॅग :

जर तुम्हाला वेस्टर्न आऊटफिटवर स्वस्तात मस्त आणि इतरांपेक्षा हटके काही करायचं असेल तर तुम्ही फ्रील डिझाइन केलेली पोटली बॅग वेस्टर्न आउटफिटसवर कॅरी करू शकता. या प्रकारच्या बॅग्समुळे तुमचा लूक वेगळा आणि उठावदार दिसू शकेल. तसेच, यात अनेक रंग आणि डिझाइन पर्याय उपलब्ध आहेत. अशा प्रकारच्या स्टाइलिंगमुळे तुमचा लूक खूपच आकर्षक दिसू शकतो. तुम्ही ही बॅग ऑनलाइनही खरेदी करू शकता.
चिकनकारी काम असणारी पोटली बॅग :

रॉयल लूकसाठी तुम्ही चिकनकारी वर्क असलेली पोटली बॅगदेखील कॅरी करू शकता . अशा बॅग्ज कॅरी केल्यानंतर लूक आणखीच सुंदर दिसतो. यात संपूर्ण बॅगवर चिकनकारी प्रकारातलं वर्क केलेलं असतं. त्यातील हँडलला मोत्याची डिझाइन केलेली असते. त्यामुळे बॅग आणखी आकर्षक दिसते. या प्रकारची बॅग तुम्ही कोणत्याही आउटफिटसोबत कॅरी करू शकता.
हेही वाचा : Beauty Tips : साडीवर या पारंपरिक हेअरस्टाइल्स दिसतील क्लासी
Edited By – Tanvi Gundaye