Sunday, February 9, 2025
HomeमानिनीFashion Tips : एथनिक वेअरसाठी ज्वेलरी निवडण्याच्या सोप्या टिप्स

Fashion Tips : एथनिक वेअरसाठी ज्वेलरी निवडण्याच्या सोप्या टिप्स

Subscribe

कोणताही सणसमारंभ असो वा पार्टी किंवा कार्यक्रम. कोणत्याही खास प्रसंगी वेगवेगळे आणि आकर्षक कपडे परिधान केले जातात. पारंपरिक कपड्यांपासून ते आधुनिक वेस्टर्न कपड्यांपर्यंत अनेक आउटफिट्स स्टाइल केले जातात. पण या निरनिराळ्या कपड्यांना खरी शोभा तेव्हाच येते जेव्हा त्यांच्यावर योग्य दागिने परिधान केले जातात. आउटफिट स्टाइल करताना, योग्य दागिन्यांची निवड केल्याने तुमचा लूक अधिक चांगला व आकर्षक बनू शकतो. हल्ली आपण पाहिलं तर लक्षात येईल की सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी बऱ्याचदा एथनिक वेअर्सला प्राधान्य दिलं जातं. परंतु या आउटफिटवर नेमके कोणते दागिने स्टाइल करायला हवे हे अनेकदा महिलांना समजत नाही. यासाठीच जाणून घेऊयात एथनिक वेअर्सवर ज्वेलरी निवडण्याच्या काही सोप्या टिप्स.

तुमच्या ब्लाउज किंवा ड्रेसच्या नेकलाइनकडे लक्ष द्या :

Fashion Tips Simple tips for choosing jewellery for ethnic wear
Fashion Tips : एथनिक वेअरसाठी ज्वेलरी निवडण्याच्या सोप्या टिप्स – ब्लाउज किंवा ड्रेसच्या नेकलाइनकडे लक्ष द्या (Image Source : Social Media)

कोणत्या प्रकारची ज्वेलरी चांगली वाटू शकते हे ठरवण्यात तुमच्या आउटफिटच्या नेकलाइनकडे लक्ष देणे गरजेचे आहे. उदाहरणार्थ, स्कूप किंवा व्ही-नेक ब्लाउजसाठी पेंडंट नेकलेस सुंदर दिसू शकतात. यामुळे कॉलरबोनकडे लक्ष वेधून घेतले जाते. गळाबंद किंवा टर्टलनेक ड्रेसमध्ये स्टड इअरिंग्ज किंवा लहानसे ब्रेसलेट उत्तम दिसू शकते. ऑफ-द-शोल्डर ड्रेससाठी स्टेटमेंट नेकलेस छान दिसू शकतो परंतु क्रू नेकसाठी तो खूप हेवी वाटू शकतो.

आउटफिटसह कलर कॉन्ट्रास्टचा विचार करा :

Fashion Tips Simple tips for choosing jewellery for ethnic wear
Fashion Tips : एथनिक वेअरसाठी ज्वेलरी निवडण्याच्या सोप्या टिप्स – आउटफिटसह कलर कॉन्ट्रास्टचा विचार करा (Image Source : Social Media)

दागिने निवडताना रंगसंगती देखील महत्त्वाची आहे. तुमचे दागिने तुमच्या पोशाखातील रंगांशी न जुळता विरूद्ध रंगांचे असतील तर त्याने तुमच्या लूकला एक वेगळाच उठाव मिळू शकतो. उदाहरणार्थ, एका मऊ पेस्टल ड्रेसवर चांदी किंवा मोत्याचे दागिने घातले जाऊ शकतात. दुसरीकडे ठळक पोशाख, जसे की लाल ड्रेस यावर तुम्ही सोनेरी किंवा हिरव्या कुंदनची ज्वेलरी परिधान करू शकता. तुमच्या आउटफिटच्या रंगांचेच दागिने घातले गेले तर त्यात एक विशिष्ट तोचतोचपणा येऊ शकतो. विरुद्ध रंगाचे दागिने एक हटके लूक देतात आणि यामुळे रंगांचेही संतुलन होते.

कम्फर्टेबल हलके कानातले :

Fashion Tips Simple tips for choosing jewellery for ethnic wear
Fashion Tips : एथनिक वेअरसाठी ज्वेलरी निवडण्याच्या सोप्या टिप्स – कम्फर्टेबल हलके कानातले (Image Source : Social Media)

जर तुम्ही दिवसभर किंवा संध्याकाळी कानातले घालण्याचा विचार करत असाल, तर तुमचा कम्फर्ट महत्त्वाचा आहे. हलक्या वजनाचे कानातले जर तुम्ही निवडले तर तुमच्या कानांना फार वजन जाणवणार नाही आणि तुम्हाला अस्वस्थही वाटणार नाही. तुम्ही स्टड, हूप्स किंवा ड्रॉप्स पसंद करत असलात तरी जे फारसे जड नसतील असे कानातले निवडण्याला प्राधान्य द्या.

स्टेटमेंट पीस परिधान करा :

Fashion Tips Simple tips for choosing jewellery for ethnic wear
Fashion Tips : एथनिक वेअरसाठी ज्वेलरी निवडण्याच्या सोप्या टिप्स – स्टेटमेंट पीस परिधान करा (Image Source : Social Media)

काहीवेळा, तुमचा लूक आकर्षक करण्यासाठी फक्त एक ठळक भाग लागतो. मोठ्या आकाराची अंगठी, चंकी नेकलेस किंवा ठळक कानातले यामुळे व्यक्तिमत्व उठावदार दिसू शकते. स्टेटमेंट पीस परिधान करताना, तुमचे बाकीचे दागिने कमीत कमी ठेवणे महत्वाचे आहे जेणेकरून स्टेटमेंट दागिना अधोरेखित होईल.

हेही वाचा : Parenting Tips : मुले अपशब्द वापरतात? असे समजवा


Edited By – Tanvi Gundaye

Manini