Thursday, March 27, 2025
HomeमानिनीFashion Tips : स्टायलिश कॉर्ड सेट

Fashion Tips : स्टायलिश कॉर्ड सेट

Subscribe

हल्ली सोशल मीडियामुळे आपल्याला फॅशनमध्ये झालेले अनेक बदल कळतात. फॅशनच्या दुनियेत कॉर्ड सेट हा एक ट्रेंडी आणि स्टायलिश पर्याय आहे. हे तुम्ही मॅचिंग टॉप किंवा बॉटमसह स्टाइल करू शकता. आजकाल कॉर्ड सेटमध्ये अनेक पर्याय आले आहेत आज आपण कोणते बेस्ट स्टायलिश कॉर्ड सेट ट्राय करू शकतो हे जाणून घेऊयात.

कॉर्ड सेटच्या बेस्ट डिझाइन्स

जर तुम्हाला काही हटके ड्रेस घालायचा असेल तुम्ही हे कॉर्ड सेट निश्चितपणे घालू शकता. हा कॉर्ड सेट घातल्याने तुम्हाला एक सुंदर आणि स्टाइलिश लूक मिळेल. तुम्ही हा ड्रेस कॉलेजमध्ये किंवा ऑफिसमध्ये घालू शकता. किंवा तुमच्या मित्रांसोबत कुठेतरी बाहेर जात असाल तर हा ड्रेस तुमच्यासाठी योग्य पर्याय आहे. तुम्ही हा ड्रेस ऑनलाइन देखील खरेदी करू शकता.

प्रिंट टॉप अँड प्लाझो

जर तुम्हाला ऑफिसमध्ये सुंदर दिसायचे असेल आणि तुमचा लूक खूपच सुंदर करायचा असेल. तर हा कॅज्युअल पोल्का डॉट प्रिंट टॉप आणि पॅलाझो को-ऑर्ड सेट ड्रेस तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे. हा ड्रेस घालून तुम्ही खूप चांगले दिसू शकता. या ड्रेससोबत तुम्ही हील्स कॅरी करू शकता. तुम्हाला हा ड्रेस ऑनलाइन सहज मिळू शकतो.जर आपण त्याच्या किंमतीबद्दल बोललो तर तुम्हाला ते 9०० रुपयांपर्यंत मिळेल.

ट्राऊजर कॉर्ड सेट

हे ट्राऊजर कॉर्ड सेट तुम्ही ऑफिसमध्ये घालू शकता. ऑफिससाठी हे कॉर्ड सेट उत्तम आहेत. हे प्रिंटेड शर्ट ड्रेस ट्राउजर को-ऑर्डर्ससह घालू शकता. तुम्हाला हा ड्रेस फक्त १००० रुपयांमध्ये ऑनलाइन मिळेल. या ड्रेससह तुम्ही हाय पोनी किंवा मोकळे केस ठेवू शकता. तसेच या ड्रेसवर तुम्ही बेल्ट देखील लावू शकता. पार्टीसाठी सुद्धा हा ड्रेस उत्तम आहे.

प्रिंटेड क्रॉप शर्ट

निळा आणि पांढरा अ‍ॅबस्ट्रॅक्ट प्रिंटेड क्रॉप्ड शर्ट स्ट्रेट ट्राउजर ड्रेस देखील तुमच्यासाठी परिपूर्ण ठरू शकतात. हा ड्रेस घातल्याने तुमचा लूक खूप सुंदर आणि परिपूर्ण दिसेल. या ड्रेसने तुम्ही तुमच्या आवडीची केशरचना देखील करू शकता.

हेही वाचा : Fashion Tips : मॉडर्न टचसाठी फूल स्लीव्स ब्लाउज


Edited By : Prachi Manjrekar

Manini