वेगवेगळ्या प्रसंगांसाठी, सणसमारंभ आणि कार्यक्रमांसाठी वेगवेगळे आउटफिट्स महिला ट्राय करत असतात. त्यातही फुलांचे डिझाइन्स असणारे फ्लोरल आउटफिट्स हे रोजच्या वापरासाठीही सहज परिधान केले जातात. फ्लोरल आउटफिट्समुळे तुमच्या स्टाइलमध्ये एकप्रकारचा ताजेपणा येऊ शकतो. फुलांचे कपडे घालून तुम्ही तुमचा दैनंदिन लूक खास बनवू शकता. पण जर तुम्हाला कम्प्लीट लूक हवा असेल, तर तुम्हाला तुमच्या फ्लोरल आउटफिटसोबत दागिने कसे मॅच करायचे हेदेखील ठाऊक असलं पाहिजे. जर तुम्हाला फ्लोरल आउटफिटमध्ये कॅज्युअल लूक हवा असेल, तर एक साधं पेंडेंट किंवा स्टड पेअर करता येईल. तर आज या लेखात आपण जाणून घेऊयात की फ्लोरल आउटफिटवर नेमक्या कोणत्या ऍक्सेसरीज घालता येऊ शकतात याविषयी.
स्टेटमेंट इअररिंग्ज घाला :

जर तुम्ही फ्लोरल प्रिंट आउटफिट घातला असेल आणि त्यात बोल्ड आणि मॉडर्न लूक कॅरी करायचा असेल, तर तुम्ही ओव्हरसाईज्ड हूप्स किंवा डँगल्ससारखे स्टेटमेंट इअररिंग्ज घालू शकता. स्टेटमेंट इअररिंग्ज घालताना, नेहमी तुमच्या फ्लोरल प्रिंटच्या रंगांशी जुळणारा रंग निवडा. स्टेटमेंट इअररिंग्ज घालताना, उर्वरित ऍक्सेसरीज अगदी साध्या आणि मिनिमल ठेवण्याची विशेष काळजी घ्या.
लेयर्ड नेकलेससह करा प्रयोग:

जर तुम्हाला फ्लोरल आउटफिटवर एक आकर्षक लूक तयार करायचा असेल, तर त्यासोबत लेयर्ड नेकलेस घालणे ही चांगली कल्पना ठरू शकते. वेगवेगळ्या लांबीचे दोन किंवा तीन नेकपीस स्टाईल करून तुम्ही एक वेगळा लूक तयार करू शकता. जर तुमच्या पोशाखाची नेकलाइन साधी असेल तर तुम्ही लहान पेंडेंट असणारी एक साखळी स्टाईल करू शकता. त्याचप्रमाणे, लेयर्ड नेकलेस लूक व्ही-नेक डिझाइन किंवा स्कूप नेक ड्रेसेससह देखील छान दिसू शकतो.
ब्रेसलेट आणि अंगठ्या:

तुम्ही तुमच्या फ्लोरल आउटफिटसोबत पातळ, नाजूक ब्रेसलेट घालू शकता. तुम्ही मेटलमधील ब्रेसलेट किंवा अंगठ्या ट्राय करू शकता. फक्त तुमच्या ब्रेसलेट किंवा अंगठीमधील खड्यांचा रंग हा तुमच्या आउटफिटला कॉम्प्लिमेंटरी असेल याकडे लक्ष द्या.
तुमचे दागिने साधे ठेवा:

जर तुम्हाला फ्लोरल प्रिंट आउटफिटसह एक सुंदर लूक तयार करायचा असेल, तर साधे दागिने घालता येतील. उदाहरणार्थ, तुम्ही तुमच्या लूकचा एक भाग म्हणून सोनेरी किंवा चांदीचा पातळ आणि नाजूक नेकपीस घालू शकता. त्याचप्रमाणे, लहान हूप्स किंवा स्टड देखील तुमच्या लूकमध्ये सुंदरता आणू शकतात. हेही वाचा : Akshata Krishnamurthy : मंगळावर नासाचे रोव्हर चालवणारी अक्षता कृष्णमूर्ती
Edited By – Tanvi Gundaye