Saturday, February 8, 2025
HomeमानिनीBeautyFashion Tips : लांब मानेसाठी बेस्ट आहेत हे चेन सेट

Fashion Tips : लांब मानेसाठी बेस्ट आहेत हे चेन सेट

Subscribe

जेव्हा आपण पार्टी किंवा कार्यक्रमासाठी आउटफिट स्टाईल करण्याचा विचार करतो तेव्हा नेहमीच एका गोष्टीकडे आपल्याला लक्ष द्यावे लागते ते म्हणजे कोणत्या आउटफिटसोबत कोणते दागिने घालायचे. कारण यामुळे आपल्या आउटफिटला एक वेगळीच शोभा येते. कोणत्या आउटफिटसोबत कोणते दागिने घालावे हे अनेक जणांना नीट समजत नाही. कधीकधी मानेच्या आकार आणि रंगाप्रमाणेही दागिने निवडणे गरजेचे असते. जर आपण यातल्या कोणत्याही बाबींचा विचार न करता दागिने निवडले तर त्याचा परिणाम आपल्या लूकवर पडू शकतो. जर तुमची मान बारीक आणि लांब असेल तर तुम्हाला चेन सेट्स अगदी परफेक्ट शोभून दिसतील. आजच्या या लेखातून जाणून घेऊयात काही चेन सेटच्या डिझाइनविषयी.

डबल पेंडंट चेन सेट :

Fashion Tips These chain sets are best for long necks
Image Source : Social Media

आकर्षक लूक मिळवण्यासाठी तुम्ही डबल पेंडंट सेट घालू शकता. या प्रकारचे पेंडंट सेट घातल्यानंतर ते चांगले दिसतात. शिवाय, यामुळे तुमचा लूक अधिकच क्रिएटिव्ह बनतो. या प्रकारच्या सेटमध्ये, समोरील पेंडंटला दुहेरी डिझाइन असते. यासह तुम्हाला एक पातळ चेन मिळते. म्हणूनच ते तुमच्या मानेवर चांगले दिसते. तुम्ही ते कोणत्याही पोशाखासोबत स्टाईल करू शकता. यामुळे लूकही चांगला येतो. शिवाय, तुम्ही ते पुन्हा वापरू शकता. तुम्हाला असे सेट ऑनलाइन आणि बाजारात 200 ते 300 रुपयांना मिळू शकतात.

सिंपल डिझाइन चेन सेट :

Fashion Tips These chain sets are best for long necks
Image Source : Social Media

तुम्ही एक साधी डिझाइन असलेली चेन देखील स्टाईल करू शकता. असे चेन सेट लांब मानेवर चांगले दिसतात. तुम्हाला असे सेट वेगवेगळ्या डिझाइन आणि पॅटर्नमध्ये मिळू शकतील. जे तुम्ही कोणत्याही पोशाखासोबत घालू शकता. या प्रकारचा चेन सेट रोजच्या वापरासाठीही तुम्हाला छान दिसू शकेल. हे तुम्हाला बाजारात किंवा ऑनलाइनही सहज मिळतील.

 स्टोन वर्क चेन सेट :

Fashion Tips These chain sets are best for long necks
Image Source : Social Media

तुमच्या मानेचे सौंदर्य वाढवण्यासाठी, तुम्ही स्टोन वर्क चेन सेट देखील स्टाईल करू शकता. असे चेन सेट घातल्यानंतर चांगले दिसतात. शिवाय यमुळे लूकही आकर्षक बनू शकतो. यामध्ये तुम्हाला चेनच्या मध्यभागी एक मोठे पेंडंट डिझाइन मिळेल. कानातल्यांसोबत, जेव्हा तुम्ही ते कोणत्याही पोशाखासोबत परिधान करता तेव्हा ते एक छान लूक देते. तुम्हाला ते ऑनलाइन आणि बाजारात सहज मिळू शकते.

यावेळी हा ज्वेलरी सेट ट्राय करा . यामुळे लूकही चांगला येईल. तसेच, तुमच्या नेकलाइननुसार दागिने स्टाईल करण्यासाठी तुम्हाला वेगवेगळे डिझाइन पर्याय मिळतील.

हेही वाचा : World Cancer Day 2025 : डीएनएच्या माध्यमातून कॅन्सर वर करू शकता मात


Edited By – Tanvi Gundaye

Manini