सौंदर्य वाढविण्यासाठी फक्त आउटफिटच नव्हे तर केसांच्या स्टाईलपासून ते पादत्राणांपर्यंत सर्व काही महत्त्वाचे आहे. जर तुम्हाला तुमच्या लूकला स्टायलिश आणि मॉडर्न टच द्यायचा असेल तर तुम्ही तुमच्या पोशाखासोबत काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. जर तुम्ही वन-पीस ड्रेस घातला असेल तर तुम्ही या आउटफिटसोबत स्नीकर्स घालू शकता. आज आपण जाणून घेऊयात अशा काही स्नीकर्स डिझाइन्सविषयी. ज्या तुम्ही वनपीससोबतही परिधान करू शकता.
पांढरे स्नीकर्स
एवढेच नाही तर, जर तुम्ही ऑफिसमध्ये वन-पीस घालून जात असाल आणि तुम्हाला तुमच्या वन-पीसानुसार स्नीकर्स घालायचे असतील, तर पांढरे स्नीकर्स तुमच्यासाठी बेस्ट पर्याय असू शकतात. कारण या रंगाचे स्नीकर्स कोणत्याही रंगाच्या वनपीससोबत परफेक्ट मॅच होऊ शकतात. हे तुम्हाला स्टायलिश लूक तर देतीलच, पण ते घालताना तुम्हाला कम्फर्टेबलही वाटेल. हे स्नीकर्स तुम्हाला 700 रुपयांमध्ये ऑनलाइन सहज मिळू शकतात. वनपीस व्यतिरिक्त तुम्ही ते कॅज्युअल लूकसोबत देखील कॅरी करू शकता.
काळ्या रंगाचे स्नीकर्स
जर तुम्ही पांढऱ्या रंगाचा फ्लोरल प्रिंटेड किंवा प्लेन वन पीस घातला असेल तर तुम्ही या आउटफिटसोबत काळ्या रंगाचे स्नीकर्स देखील ट्राय करू शकता . हे तुमच्या लूकला आधुनिक आणि सुंदर टच देण्यास खूप मदत करेल. तुमच्या बजेटमध्ये तुम्हाला हे स्नीकर्स सहज मिळतील. तुम्ही ते 700 रूपयांपर्यंत सहज खरेदी करू शकता.
हलके लेस अप स्नीकर्स
जर तुम्हाला तेच तेच स्नीकर्स घालण्याचा कंटाळा आला असेल आणि तुम्हाला वन पीस ड्रेससोबत ट्रेंडी आणि स्टायलिश स्नीकर्स घालायचे असतील, तर हलके लेस अप स्नीकर्स तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय असू शकतात. तुम्ही हे तुमच्या ऑफिसमध्येही घालू शकता. हे तुम्हाला फक्त स्टायलिश लूकच देणार नाही तर तुम्हाला त्यात कम्फर्टेबलही वाटेल. तुम्हाला हे स्नीकर्स फक्त 750 रुपयांमध्ये ऑनलाइन मिळतील.
हेही वाचा : Women’s Day 2025 : विश्वाच्या जननीचं जतन व्हायलाच हवं…
Edited By – Tanvi Gundaye