सर्वच महिलांना साडी नेसायला फार आवडते. पण जेव्हा आपण मॅचिंग ब्लाउज किंवा वेगळ्या डिझाइनचा ब्लाउज घालतो तेव्हा आपला साडीतला लूक अधिकच खुलून दिसतो. वेगवेगळ्या साड्यांच्या पॅटर्नप्रमाणे वेगवेगळे ब्लाउज डिझाइन्स आपल्याला पाहायला मिळतात. जर चेक्सची साडी असेल तर त्यावर नेमका कोणता ब्लाउज स्टाइल करायचा हे आपल्याला समजत नाही. कारण चेक्सच्या साडीचे पॅटर्न हे थोडे भरीव असते. यासाठीच चेक्सच्या साडीवर कोणत्या प्रकारचे ब्लाउज घालता येऊ शकतात हे आजच्या या लेखातून जाणून घेऊयात.
प्लेन डिझाइनचे ब्लाउज
चेक्सच्या साडीसोबत तुम्ही प्लेन ब्लाउज घालू शकता. या प्रकारचा ब्लाउज चेक्सच्या साडीसोबत सुंदर दिसेल. यामुळे तुम्ही छान दिसाल. या प्रकारच्या ब्लाउज पॅटर्नमुळे तुमच्या साडीची चेक्स डिझाइन अधिक ठळकपणे उठून दिसेल. शिवाय, तुम्ही ग्रेसफुलही दिसाल. तुम्ही त्यासोबत साध्या डिझाइनचे दागिनेही घालू शकता.
प्रिंटेड डिझाइन ब्लाउज
जर तुम्हाला कॉन्ट्रास्टिंग ब्लाउज घालायचा असेल तर त्यासाठी तुम्ही प्रिंटेड डिझाइन असलेला ब्लाउजदेखील घालू शकता. या प्रकारचे ब्लाउज घातल्यानंतर तुम्हाला कम्फर्टेबल वाटू शकते. त्यात तुम्हाला लहान प्रिंटचे डिझाइन्स मिळतील. यामुळे साडीचे सौंदर्य अधिकच खुलेल. तसेच, तुम्ही त्याच्यासोबत सुंदर व आकर्षक दागिने देखील परिधान करू शकता. परंतु प्रिंटेड डिझाइन्स असल्यामुळे दागिने मिनिमल ठेवण्याकडे लक्ष द्या.
हाफ प्रिंटेड हाफ प्लेन डिझाइन ब्लाउज
तुम्ही फोटोमध्ये दिसणारा ब्लाउज साडीसोबत घालू शकता. यामध्ये बॉर्डरवर चेक डिझाइन दिले आहे. बाकीचा ब्लाउज साध्या डिझाइनमध्ये आहे. यामुळे साडी छान दिसते. शिवाय, ब्लाउज आणखी छान दिसतो. तुम्हाला असे ब्लाउज रेडीमेड मिळू शकतील. यावेळी हा ब्लाउज वापरून पहा. यामुळे तुमची संपूर्ण साडी सुंदर दिसेल. शिवाय, तुम्ही छान दिसाल. बाजारात तुम्हाला रेडीमेड डिझाइनमध्ये असे ब्लाउज मिळतील किंवा तुम्हाला हवे असल्यास तुम्ही कापड खरेदी करून ते तयार करू शकता. याच्या मदतीने तुम्हाला एकदम परफेक्ट फिटिंग ब्लाउज मिळेल . तुम्ही तुमच्या आवडीनुसार नेकलाइन बनवू शकता.
हेही वाचा : Health Tips : इडली आरोग्यास घातक ; सरकारने का घातली बंदी ?
Edited By – Tanvi Gundaye