जेव्हा तुम्ही ट्रेडिशनल आऊटफिट परिधान करता तेव्हा या पारंपरिक पोशाखांमध्ये, दागिने तुमचा लूक स्टायलिश बनवण्याचे काम करतात. या दागिन्यांपैकीच एक महत्त्वाचा भाग म्हणजे बांगड्या. तुम्हाला अनेक डिझाइन्सच्या बांगड्या मिळतील. पण, जर तुम्हाला साडीमध्ये स्टायलिश आणि रॉयल लूक हवा असेल तर तुम्ही या नवीन डिझाइन केलेल्या बांगड्या साडीसोबत स्टाइल करू शकता. या प्रकारच्या बांगड्या तुमचा लूक रॉयल बनवण्यात मदत करतील आणि तुमचा लूक देखील सुंदर बनवतील.
कुंदन वर्क बांगडी :
तुम्ही तुमच्या आउटफिटला मॅच करून या प्रकारची बांगडी स्टाइल करू शकता. या बांगड्यांना कुंदन तसेच रेशमी धाग्यांचे वर्क केलेले असते जे तुमच्या साडीला रॉयल लूक देऊ शकतील. तुम्ही या प्रकारच्या बांगड्या गडद रंगाच्या साडीसोबत स्टाइल करू शकता आणि तुम्हाला ही बांगडी 500 रुपये किमतीत मिळू शकते.
मोती वर्क बांगडी :
रॉयल लूक मिळवण्यासाठी, तुम्ही हलक्या रंगाच्या साडीसह या प्रकारच्या मोत्याच्या बांगड्या स्टाइल करू शकता . या बांगडीवर सुंदर काम केलेले असते आणि यासोबत तुम्हाला लटकनचादेखील पर्याय उपलब्ध होऊ शकतो. या प्रकारची बांगडी परिधान केल्यानंतर, तुमचा लूक रॉयल दिसेल आणि तुम्ही ही बांगडी ऑनलाइन किंवा ऑफलाइन स्वस्त दरात खरेदी करू शकता.
वेलवेट मेटल डायमंड वर्क बांगडी :
ही बांगडी तुम्ही पेस्टल रंगाच्या साडीसोबत स्टाईल करू शकता. या बांगड्या मेटलमध्ये असतात आणि त्यावर डायमंड वर्क केलेले असते. या प्रकारच्या बांगड्या स्टाईल केल्यानंतर, तुमचा साडीतील लूक खूप सुंदर दिसेल आणि तुम्ही या बांगड्या 500 ते 700 रुपये किमतीत खरेदी करू शकता.
स्टोन वर्क बांगडी :
या प्रकारच्या बांगड्या तुम्ही साडीसोबत स्टाईल करू शकता. या प्रकारच्या बांगड्यामध्ये तुमचा लूक खूपच सुंदर दिसेल. ही बांगडी तुम्ही साडीच्या रंगानुसार अनेक रंगांच्या पर्यायांमध्ये खरेदी करू शकता.
हेही वाचा : Christmas Fashion Tips : ख्रिसमसला हे मॅक्सी ड्रेस करा ट्राय
Edited By – Tanvi Gundaye