घरलाईफस्टाईलउपवास रेसिपी : राजगिऱ्याचा डोसा

उपवास रेसिपी : राजगिऱ्याचा डोसा

Subscribe

यंदाच्या नवरात्रौत्सवाला नक्की करा - राजगिऱ्याचा हेल्दी डोसा

नवरात्र उत्सवाला अवघे दोन दिवस राहिले आहे. या नवरात्रौत्सवाची जोरदार तयारी पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी गरब्याची तयारी केली जात आहे. तर बरीच मंडळी उपवासाकरता रेसिपी शोधत आहेत. अशीच एक नवरात्रौत्सवाच्या उपवासाकरता पोट भरले अशी रेसिपी तुमच्यासाठी खास घेऊन आलो आहोत. चला तर जाणून घेऊन चटकदार आणि हेल्दी राजगिऱ्याच्या डोस्याची रेसिपी.

साहित्य

- Advertisement -
  • दोन वाट्या राजगिऱ्याचे पीठ
  • २-३ मिरच्या
  • मीठ
  • एक टिस्पून जिरे
  • एक उकडलेले रताळे
  • तूप
  • आवडीनुसार पाणी किंवा ताक

कृती

मिरच्या, मीठ आणि जिरे मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावेत. त्यानंतर त्यात उकडलेले रताळे कुस्करून राजगिऱ्याच्या पीठात मिसळावे. नंतर मिक्सरमध्ये बारीक केलेले मिश्रण घालून पाणी किंवा ताक मिसळून डोशाच्या पिठाप्रमाणे पीठ तयार करावे. हे तयार झालेले पीठ नॉनस्टिक पॅनवर तूप टाकून डोसे तयार करावेत. हे तयार झालेले स्वादिष्ट डोसे दह्याबरोबर किंवा चटणीसोबत खावेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -