Sunday, September 24, 2023
Eco friendly bappa Competition
घर मानिनी Health जिमशिवायही असे करा फॅट बर्न

जिमशिवायही असे करा फॅट बर्न

Subscribe

धावपळीच्या आयुष्यात कधी-कधी फिटनेससाठी वेळ काढणे मुश्किल होते. मात्र काही लोक आपल्या फिटनेससाठी दररोज जिमला जातात. ऑफिसला जाणारी बहुतांश लोकांची घाई होत असल्याने जिमला जाणे टाळतात. याच कारणास्तव महिलांच्या शरिरातील काही अवयवयांच्या ठिकाणी अतिरिक्त चरबी जमा होते. यापासून तुम्ही सुटका मिळवू ही शकता. त्यासाठी जिमला जाण्याची गरज नाही. पुढील काही टीप्स फॉलो करून फॅट बर्न करू शकता. (Fat burn tips)

-संतुलित आहाराचे सेवन
अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी सर्वात प्रथम संतुलित आहाराचे सेवन करा. खुप तळलेले पदार्थ, मसालेदार पदार्थ आणि प्रोसेस्ड फूड खाण्यापासून दूर रहा. शरिरात चरबी वाढण्यामागील कारण म्हणजे डीप फ्राइड फूड.

- Advertisement -

एका संतुलित आहारामध्ये लीन प्रोटीन, कार्बोहाइड्रेट, हेल्दी वसासाठी फळं आणि भाज्यांचा समावेश करावा. त्याचसोबत अधिक गोड पदार्थ, मैद्याचे पदार्थ खाणे टाळावे.

-फायबरचे सेवन करा
आपल्या आहारात फायबरचे सेवन अधिक केल्याने शरिरातील चरबी कमी होण्यास मदत मिळू शकते. फायबर तुमच्या पचनतंत्रात हळूहळू पचते आणि तुम्हाला दीर्घकाळ यामुळे भूक लागत नाही. फळं, भाज्या, कडधान्य आणि फाय फायबर खाद्यपदार्थांचे सेवन करावे.

- Advertisement -

-शरिरात पुरेशा प्रमाणात प्रोटीन
चरबी कमी करण्यासाठी हलकी एक्सरसाइज करण्यासह प्रोटीनचे सेवन करू शकता. यामुळे तुम्ही क्रेविंक पासून दूर राहू शकता आणि तुमची भूक ही कंट्रोल होऊ शकते. अशातच वजन कमी होण्यासह अतिरिक्त चरबी ही यामुळे कमी होते.

-पुरेशा प्रमाणात पाणी प्या
जर शरिरातील अतिरिक्त चरबी दूर करायची असेल तर पुरेशा प्रमाणात पाणी प्या. काही अभ्यासातून असे समोर आले आहे की, जर तुम्ही जेवणासह पाणी पित असाल तर यामुळे पोट लगेच भरले जाते आणि तुम्ही जेवण कमी जेवता. लक्षात ठेवा की, हाइड्रेट राहण्यासाठी सॉफ्ट ड्रिंक, रेडीमेड ज्यूसचे सेवन करू नका. कारण त्यामध्ये साखरेचे प्रमाण अधिक असते. जे तुमच्या कॅलरीजला कमी करण्याऐवजी अधिक वाढवू शकतात.


हेही वाचा- पार्टनरसोबत एक्सरसाइझ करणे सेक्स लाइफसाठी फायदेशीर

- Advertisment -

Manini