बदलती जीवनशैली, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी यामुळे अनेक शारीरिक आजार उद्भवत आहेत. यातील एक समस्या फॅटी लिव्हरची आहे. नुकतंच हैदराबाद विद्यापीठाच्या एका अभ्यासानुसार, भारतातील आयटी क्षेत्रात काम करणारे 80 % पेक्षा जास्त कर्मचारी फॅटी लिव्हरच्या समस्येने त्रस्त असल्याचे समोर आले आहे. यामागे जास्त वेळ एकाच जागी बसणे, ताणतणाव, अस्वास्थकर खाणे-पिणे, शारीरिक हालचालींचा अभाव अशी काही सामान्य कारणे आहे. त्यामुळे तज्ञांकडून आरोग्याच्या बाबतीत वेळीच सावध होण्याचा इशारा देण्यात आला आहे. खरं तर फॅटी लिव्हर ही एक गंभीर समस्या असून जी लिव्हरमध्ये अतिरीक्त चरबी जमा झाल्यामुळे होते. त्यामुळे वेळीच काळजी घेतली नाही तर लिव्हर सिरोसीस किंवा लिव्हर कॅन्सरसारख्या गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात.
फॅटी लिव्हरची लक्षणे –
थकवा आणि अशक्तपणा – लिव्हर सुरळीत काम करत नसल्याने शरीरात एनर्जी कमी होऊन थकवा आणि अशक्तपणा जाणवतो.
पोटदुखी – लिव्हरमध्ये आणि आसपास दुखणे.
वजन कमी होणे – काहीही कारण नसताना वजन कमी होणे
भूख कमी होणे – भूक कमी होते आणि पचनाच्या तक्रारी
फॅटी लिव्हरची कारणे –
- एकाच जागी बसणे
- अस्वास्थ खाण्याच्या सवयी
- ताण
- शारीरिक हालचालींचा अभाव
- लठ्ठपणा आणि डायबिटीस
फॅटी लिव्हर कसा टाळाल ?
- ताजी फळे, भाज्या, धान्य, प्रथिनयुक्त आहार खावा.
- तेलकट पदार्थ खाणे टाळावे.
- दररोज किमान 30 मिनिटे व्यायाम किंवा योगा करावा.
- जास्त वेळ एकाच जागी बसून काम करणे टाळावे.
- लठ्ठपणा हे फॅटी लिव्हरचे कारण आहे, त्यामुळे वजनावर नियंत्रणावर लक्ष ठेवावे.
- स्ट्रेस घेऊ नये.
- मेडिटेशन, योग करावा.
- झोप पूर्ण करावी.
- मद्यपान, स्मोकिंग यापासून दूर राहावे.
- वेळोवेळी लिव्हर फंक्शन टेस्ट कराव्यात.
हेही पाहा –