घरलाईफस्टाईलउपाशी राहिल्यास येतो राग...

उपाशी राहिल्यास येतो राग…

Subscribe

उपाशी राहिल्यास, बऱ्याच जणांना राग येतो. त्यावर नियंत्रण कसे मिळवावे याबद्दल जाणून घेऊया.

खूप भूक लागल्यावर तुम्हालाही राग येतो का? पण राग नक्की भूक लागल्यानंतर येतो आहे हे मात्र कळत नाही आणि तुम्ही चिडचिड करायला सुरुवात करायला लागता. असं तुमच्याबरोबरही घडतं ना? वैज्ञानिकांनी या गोष्टीला दुजोरा दिला आहे. वैज्ञानिकांच्या मते, असं परस्पर क्रिया, व्यक्तिमत्व आणि आजूबाजूच्या परिस्थितीमुळं घडतं. अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ नॉर्थ केरोलाईनाच्या जेनिफर मॅकोर्माक नावाच्या डॉक्टर विद्यार्थीनीनं याचं कारण सांगितलं आहे.

जेनिफरनं केलेल्या अभ्यासात काय आहे?

‘आपल्याला भूक लागल्यानंतर आपल्या भावना आणि दुनियेबद्दल आपले विचार वाढत जातात. नुकताच ‘हंगरी’ हा शब्द ऑक्सफर्ड शब्दकोशात स्वीकारण्यात आला असून, भूकेने येणाऱ्या रागाला या शब्दाचा वापर करण्यात येणार आहे.’ असं जेनिफरनं स्पष्ट केलं आहे. तसंच ४०० लोकांचं निरीक्षण केल्यानंतर केवळ वातावरणाचा परिणाम होत नाही तर त्याबरोबर भावनेलादेखील तितकेच महत्त्व असल्याचं तिनं सांगितलं. याबाबतीत जास्त जागरूक असलेल्या लोकांना अर्थात भूक लागली आहे हे कळत असलेल्यांना राग कमी येतो असंही स्पष्ट झालं आहे. तर ‘इमोशन’ जर्नलनं प्रकाशित केल्याप्रमाणं जेनिफरच्या मते, भुकेशी जोडलेल्या नेमक्या भावना काय आहेत, याचा अभ्यास करणं हेच उद्दिष्ट असल्याचं सांगितलं.

- Advertisement -

रागावर कसे नियंत्रण ठेवावे?

राग आपल्याला वेगवेगळ्या कारणांनी येत असतो. मात्र, आपल्या नियंत्रणाबाहेर राग जात असल्यास, मानसिक आणि शारीरिक दोन्हीसाठी तो वाईट ठरतो. रागावर नियंत्रण कसे ठेवावे हे जाणून घेऊ.
१. काहीही बोलायच्या आधी नीट विचार करा, अन्यथा समोरच्या व्यक्तीला तुमच्या शब्दांमुळं राग येऊ शकतो. त्यामुळं आधी विचार करा, मग बोला.
२. राग येण्याचे संकेत ओळखणे गरजेचे आहे. असे संकेत दिसायला लागल्यानंतर स्वतःला नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करावा.
३. खूपच राग येत असल्यास, मनात आकडे म्हणावे अथवा विषयाकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करावा.
४. राग आला असला तरीही सकारात्मक दृष्टीनं मांडल्यास, समोरचा दुखावला जाणार नाही. त्यामुळं त्यादृष्टीनं प्रयत्न करावा.
५. राग आल्यास, दीर्घ श्वास घेऊन ३ ते ४ वेळा सोडा. असं केल्यास, रागावर नियंत्रण ठेवण्यास मदत होईल.
६. रात्री किमान ८ तास झोप घ्या. झोप पूर्ण न झाल्यास, रागावर नियंत्रण ठेवणे कठीण जाते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -