Thursday, April 18, 2024
घरमानिनीHealthFemale Condoms चा असा करा वापर

Female Condoms चा असा करा वापर

Subscribe

आजकालची लाइफस्टाइल किती ही हायटेक झाली असेल पण तरीही समाजात आज बहुतांश महिला आणि तरुणी अशा आहेत ज्या मासिक पाळी किंवा सेक्स बद्दल खुलेपणाने बोलत नाहीत. हेच कारण आहे की, काही महिलांना माहितीच नसते अनवॉन्टेड प्रेग्नेंसी रोखण्यासाठी कंडोम केवळ पुरुषांसाठी नव्हे तर महिला सुद्धा वापरु शकतात.

तुम्हाला फिमेल कंडोम म्हणजे नक्की काय आणि याचा वापर कसा केला जातो हे माहितेय का? तसेच ते नक्की कसे वापरायचे हे सुद्धा आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

- Advertisement -

फिमेल कंडोम म्हणजे काय?
फिमेल कंडोमला इंटरनल कंडोम असे सुद्धा म्हटले जाते. हे कंडोम सॉफ्ट आणि लूज फिटिंग पाउच असतो. याचा सेक्सपूर्वी वापर केला जाऊ शकतो. फिमेल कंडोम हे टॅम्पॉन प्रमाणेच वजाइनच्या आत इंसर्ट करुन वापरले जाते.

- Advertisement -

का वापरले जाते?
सेंटर फॉर डिजीज कंट्रोल आणि प्रिवेंशननुसार फिमेल कंडोम महिलांसाठी सुरक्षित आहे. फिमेल कंडोमचा वापर अनवॉन्टेड प्रेग्नेंसी रोखण्यासाठी केला जातो. त्याचसोबत एसटीआय पासून बचाव करण्यासाठी सुद्धा फिमेल कंडोमचा वापर करणे बेस्ट मानले जाते. याचा वापर फिजिकल रिलेशन बनवण्यासाठी केली जाते.

वापर करण्यापूर्वी पुढील काही गोष्टी लक्षात ठेवा
-फिमेल कंडोमचा वापर करण्यापूर्वी याची एक्सपायरी डेट तपासून पहा. तसेच कंडोमच्या पॅकेटवर दिलेली माहिती सुद्धा वाचा.
-कंडोमचा वापर करण्यापू्र्वी त्याला एखादा छिद्र तर नाही ना हे सुद्धा पहा.
-कंडोम नेहमीच थंड आणि सुक्या जागी स्टोर करा. वापर करताना तुम्ही ल्युबचा वापर करा.
-जर तुम्ही फिमेल कंडोमचा वापर करत असाल तर पार्टनरला मेल कंडोम वापरण्यास सांगू नका. कारण ते फाटू शकते.
-एकदा वापर केल्यानंतर कंडोमचा पुन्हा वापर करु नका.


हेही वाचा- Egg Freezing साठी योग्य वय, का वाढतोय याचा महिलांमध्ये ट्रेंड?

- Advertisment -

Manini