मेथी आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आणि उत्तम आहे. यामध्ये फायबर, मॅग्नेशियम, लोह, व्हिटॅमीन असते. त्यामुळे आपल्याला कोणतेही आजरी होत नाही आपली रोगप्रतिकारशक्ती देखील वाढते. आज आपण जाणून घेऊयात उत्तम आरोग्यासाठी मेथी किती फायदेशीर आहे.
पचनासाठी फायदेशीर
गॅस, अपचन आणि बद्धकोष्ठतेपासून आराम देते. आतड्यांच्या हालचाल देखील सुधारते. प्रोबायोटिक गुणधर्मामुळे चांगल्या बॅक्टेरियांची वाढ होते. मेथीमध्ये असलेले फायबर आणि पाचक एंझाइम पचन सुधारते.
मधुमेह रुग्णांसाठी
मधुमेह रुग्णांसाठी मेथी अत्यंत फायदेशीर आहे. यामागचं कारण म्हणजे इन्सुलिन संवेदनशीलता सुधारते आणि रक्तातील साखर स्थिर ठेवते.
हृदयाच्या आरोग्यासाठी
मोड आलेल्या मेथीमध्ये अनेक पोषक तत्व आढळतात ज्यामुळे तुमच्या हृदयाचे आरोग्य निरोगी राहाण्यास मदत होते. तुमच्या हृदयाचे आरोग्य निरोगी करण्यासाठी महिनाभर सकाळी रिकाम्यापोटी मोड आलेल्या मेथीचे सेवन तुम्ही करू शकता.
वजन नियंत्रित राहते
मेथीचे सेवन केल्याने वजन नियंत्रित राहण्यास मदत होते.मेथीमध्ये फायबर असल्याने ते वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते.
संधिवात आणि सांधेदुखीवर उपाय
मेथीचे सेवन केल्याने संधिवात आणि सांधेदुखीचा त्रास कमी होतो.
स्त्रियांसाठी फायदेशीर
मेथीचे दाणे मासिक पाळीच्या वेदना कमी करण्यास मदत करते. मासिक पाळीच्या अनियमिततेवर मदत करण्यास आणि कमी रक्तस्त्राव दूर करण्यास मदत करतात. मेथीमध्ये अँटी-इन्फ्लेमेटरी आणि अँटिस्पास्मोडिक गुणधर्म असतात.
मेथीचे सेवन कसे करावे?
- एक ते दीड चमचे मेथीचे दाणे रात्री एक ग्लास पाण्यात भिजत ठेवा.
- सकाळी उठल्यानंतर हे पाणी गाळून रिकाम्या पोटी प्या.
- मेथीच्या बिया पाण्यात भिजवून स्प्राउट्स बनवून सॅलडमध्ये घालता येतात.
- केसांच्या वाढीसाठी मेथीच्या बिया पाण्यात भिजवून घेता येतात.
- मेथीच्या बिया हेअर मास्क किंवा तेलात टाकून वापरता येतात.
हेही वाचा : Morning Breakfast : नाश्त्यात रोज ब्रेड खाताय?
Edited By : Prachi Manjrekar