घरलाईफस्टाईलउत्सवांसाठी फेस्टिव्ह लुक्स

उत्सवांसाठी फेस्टिव्ह लुक्स

Subscribe

नवरात्रौत्सव सुरू आहे. या दिवसांत आपण सुंदर दिसावे यासाठी तरूणींची धडपड असते. प्रत्येकीला या काळात सुंदर आणि आकर्षक दिसायचं असतं. आम्ही तुम्हाला काही सोप्या आणि ट्रेण्डी टिप्स देत आहोत, ज्यामुळे तुमच्या उत्सवी वेषभूषेला एक वेगळीच झळाळी प्राप्त होईल.

जितकं कमी तितकं जास्त चांगलं

चेहर्‍यावरच्या फाइन लाइन्स लपवण्यासाठी सर्वप्रथम कन्सिलरचा उपयोग करावा. कोल पेन्सिल घेऊन डोळ्याच्या आतल्या तसंच बाहेरच्या कडांना ठळक स्ट्रोक्स मारावेत. चेहर्‍यावरचा कंटाळा निघून जाण्यासाठी व्हॉल्युमिनिझिंग मस्कारा वापरावा. चमकते ओठ नेहमीच आकर्षक दिसतात. सर्वात शेवटी ओठांना न्यूट्रल किंवा पिंक शेडची लिपस्टिक लावावी.

- Advertisement -

आपल्या सर्वोत्तम फीचर्सना अधिक ठळक बनवा

डोळे हे तुमचं सर्वात चांगलं फीचर असल्याचं वाटत असेल तर त्यांना पॉप इफेक्ट द्यावा. लूक अधिक लक्षवेधी बनवण्यासाठी डोळ्यांचा मेकअप थोडा आणखी पुढे न्यावा. तुमच्याकडे चकमण्याचा इफेक्ट देणारी पावडर असेल तर ती मस्काराच्या दोन कोट्सदरम्यान लावावी. त्यामुळे पापण्या भरघोस दिसतील. ओठांना अधिक लक्षवेधी करायचं असेल तर गडद शेडची लिपस्टिक वापरावी. एकंदरीत चेहरा भरीव दिसण्यासाठी गुलाबी किंवा पीच रंगाच्या ब्लशचा वापर करावा. त्यामुळे चीक बोन्स उठून दिसतील.

नाट्यमय डोळे

संध्याकाळसाठीचा मेकअप असेल तर डोळे जितके स्मोकी दिसतील तितके उत्तम. परफेक्ट स्मोकी डोळ्यांसाठी साजेशी आयशॅडो वापरा. बहुसंख्य भारतीयांचे डोळे काळे किंवा तपकिरी असल्याने सोनेरी, तपकिरी, गडद काळा आणि करडा या रंगाचे आयशॅडोज वापरणं उत्तम. हा लूक झटपट मिळवायचा असेल तर वरच्या पापणीवर या रंगाच्या आय पेन्सिलने आतल्या बाजूने बाहेरच्या बाजूला जाणारी जाड रेष आखावी. बाहेरच्या बाजूला ती थोडी पुसावी. हा लूक पूर्ण करण्यासाठी खालच्या पापणीवरही अशीच क्रिया करावी.

- Advertisement -

पारंपरिक साज

या उत्सवी काळात आपण पारंपरिक कपडे घालणं जास्त पसंत करतो. त्यामुळे आपला मेकअपही त्याला साजेसा हवा. हा मेकअप कपड्यांशी मेळ खाणारा हवा. साडी किंवा सलवार सूट खूप झकपक असेल तर मेकअप साधा आणि कमीतकमी ठेवा. अन्यथा उलट असावं. कोणत्याही कपड्यांवर शोभून दिसणारा न्यूट्रल लूक साधायचा असेल तर पापण्यांना सोनेरी रंग लावा आणि डोळ्याच्या बाहेरच्या बाजूला गडद तपकिरी रंग लावावा जो बाहेरच्या दिशेला झुकलेला असेल. त्यामुळे डोळ्यांचा आकार अधिक उठावदार बनेल. वरच्या पापणीला विंग लायनर लावावा आणि खालच्या पापणीवर काजळाची गडद रेघ काढावी. आणखी पारंपरिक दिसण्यासाठी बिंदी घालावी.

नैसर्गिक लूक

अनेक जणींना न्यूड लूक खूप आवडतो. डोळ्यांना गुलाबी आणि जांभळ्या अशा पेस्टल शेड्स लावून चेहरा आणखी तजेलदार बनवता येतो. ओठांना हलक्या नारिंगी रंगाची लिपस्टिक लावावी आणि गालांनाही तोच रंग द्यावा जेणेकरून रंगाचा एक छान प्रभाव दिसून येईल. सर्व लूक्सना मस्कारा आणि फाऊंडेशनची जोड द्यावी. एचडी फाऊंडेशन्स आणि एअरब्रशचा वापर करावा.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -