Monday, December 11, 2023
घरमानिनीFashionफेस्टीव सिझनसाठी खास हेयरस्टाईल

फेस्टीव सिझनसाठी खास हेयरस्टाईल

Subscribe

महिला नेहमीच कपडे ते फुटवेअर अशा सर्व गोष्टींकडे आवर्जुन लक्ष देतात. काही वेळेस असे होते की, हटके दिसण्यासाठी विविध प्रकारच्या लूक्सही ट्राय केले जातात. पण सर्वाधिक जास्त महिला आपल्या लूक्समुळे कंफ्युज असतात. त्यांना कळत नाही की, कोणत्याप्रकारची हेअर स्टाइल फेस्टिव्ह सीजनमध्ये केली पाहिजे. जेणेकरुन आपण सुंदर दिसू. त्यामुळे पुढील काही हेअरस्टाईल तुम्ही फेस्टिव्ह सीजनमध्ये नक्की ट्राय करू शकता.

बन हेअर स्टाइल

- Advertisement -


फेस्टिव्ह सिझनमध्ये बहुतांश महिला एथनिक आउटफिट वेअर करणे पसंद करतात. अशातच तुम्ही बन हेअर स्टाइल करू शकता. यासाठी तुम्ही स्लीक बन हेअर स्टाइल करू शकता.

हाय पोनीटेल विथ हैवी कर्ल हेअर स्टाइल

- Advertisement -


ही हेअर स्टाइल करण्यासाठी सर्वात प्रथम केसांसाठी हैवी कर्ल क्रिएट करावे लागतील. त्यानंतर स्प्रे च्या मदतीने ते सेट करून घ्या. आता एक रबर बँन्ड घेऊन हाय पोनीटेल बांधा आणि हेअर पिनच्या मदतीने ते व्यवस्थितीत सेट करा.

सिंपल स्ट्रेट हेअर स्टाइल


सिंपल स्ट्रेट हेअर स्टाइलसाठी सर्वात प्रथम तुम्ही केस विंचरून घ्या. आता ते स्ट्रेटरनच्या मदतीने स्ट्रेट करा. हवं तर तुम्ही पुढच्या बाजूने पफ तयार करून हेअर स्टाइल लूक पूर्ण करू शकता.


हेही वाचा- Diwali 2023: नाईट पार्टीत स्लिम लूकसाठी स्लिट कट ड्रेस

- Advertisment -

Manini