घरलाईफस्टाईलकोरोनातून बरे झाल्यानंतर सुका मेवा का खावा ..जाणून घ्या

कोरोनातून बरे झाल्यानंतर सुका मेवा का खावा ..जाणून घ्या

Subscribe

आपल्या दररोजच्या धावपळीत रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास सुका मेवा अत्यंत प्रभावकरी आहे. तसेच काजू,बदाम,अक्रोड,माणूके ओले करून खल्यास शरीराला जास्त फायदेशीर ठरतो असे देखील बोलण्यात येत आहे. याचे काय फायदे आहेत हे आपण जाणून घेऊया.

जगभरामध्ये कोरोना पुन्हा डोके वर काढत आहे. कोरोना पासून बचावा करिता सरकारने अनेक नियम व अति लागू केल्या आहेत. या नियमांचे पालन करणे महत्वाचे आहेच पण त्यापेक्षाही सर्वाधिक महत्वाचे आहे आल्या शरीरातील रोगप्रतिकारशक्ति वाढवणे. अनेक जण कोरोनाला रोखण्यासाठी आयुर्वेदीक काढा, औषधांचे सेवन करत आहे. तर व्हिटामीन- सीयुक्त फळे खाण्यावर भर देतात. दरम्यान हेल्थ एक्सपर्टसही कोरोनाविरोधात रोगशक्ती वाढवत असलेल्या गोष्टींवर अधिक भर देत आहेत.कोरोना व्हायरस सारख्या भयंकर आजारापासून वाचण्यासाठी आपण घरो-घरी अनेक उपाय करतो. व्यायाम,प्राणायाम,योगा,मेडिटेशन याव्यतिरिक्तसुद्धा काढा पिणे,आहारात योग्य बदल करणे, रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास अनेक गोळ्या औषधांचा समावेश आपण करतो.तसेच रोगप्रतिकारशक्ती उत्तम ठेवण्यासाठी आहारात सुका मेव्याचे सेवन करण्यास भर द्यावा असे सांगण्यात येत आहे. आपल्या दररोजच्या धावपळीत रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास सुका मेवा अत्यंत प्रभावकरी आहे. तसेच काजू,बदाम,अक्रोड,माणूके ओले करून खल्यास शरीराला जास्त फायदेशीर ठरतो असे देखील बोलण्यात येत आहे. याचे काय फायदे आहेत हे आपण जाणून घेऊया.

भिजवलेले मनुके-
हेल्थ न्यूट्रिशियन नुसार भिजवलेले मनुके मध्ये जास्त प्रमाणात पोषक तत्वे आढळून येतात.यामध्ये आयर्न,कैल्शियम,विटामिन सी, विटामिन बी, इन्स्टंट एनर्जी आणि पोटेशियम गुंढरमणे परिपूर्ण ओले माणूके हाडांसाठी बोरॉन तसेच अॅंटीऑक्सीडेंट्स मुळे आपल्या शारीलाला इंफेक्शन पासून दूर ठेवण्यास मदत करते.

- Advertisement -

भिजवलेले काजू –

सुक्या मेवा मधील जास्त प्रमाणात चरबी वाढवू शकणारा घटकामध्ये काजू गणला जातो म्हनौन याचे योग्य व कमी प्रमाणात सेवन केल्यास त्याचे शरीराला फायदे नक्की होऊ शकतात. शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास काजू उपयोगी पडतो. काजूमुळे मेंदूच कार्य अधिक चांगल होतं. त्यामुळे ब्रेन अधिक स्मार्ट करण्यासाठी काजू खाल्लेले अधिक फायदेशीर असतात.

- Advertisement -

भिजवलेले बदाम –

बदाम सुके खाण्यापेक्षा दररोज रात्री पाण्यात भिजवून सकाळी याचे सेवन केल्यास शरीरास जास्त लाभदायक ठरते. तसेच बदामातील अॅंटीऑक्सीडेंट घटक शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी करतात बदाम हे पौष्टीक गुणांनी भरलेलं आहे. बदाममध्ये विटामिन ई, झिंक, कॅल्शियम, मॅग्नीशियम, ओमेगा-3, फॅटी अॅसिड्स यासारखे अनेक पोषक तत्व असतात. बदाम हे पाण्यात भि़जवून खाल्ले पाहिजेत कारण यामुळे त्याच्यावरचं टरफल किंवा साल ही बदामावरुन सहज निघून जाते.बदामावरच्या सालीवर टॅनीन नावाचं एक तत्व असतो जो बदामातील इतर पोषक तत्वांचं अवशोषण करण्यास रोकतो. बदामावरचं साल तसंच राहिल्यास त्याच्या तुमच्या शरीराला अधिक फायदा होत नाही. त्यामुळे त्यावरचं साल निघून जाणं अधिक महत्त्वाचं असतं.

भिजवलेले अक्रोड –

खाण्यास चविष्ट तश्च औषधी गुणधर्म परिपूर्ण असणार्‍या अक्रोडचे शारीरिक आरोग्य बरोबरच मेंदुसाठी,केसांसाठी,तान तनाव कमी करण्यास तसेच हृदयासाथी फायदेशीर असल्याचे बोलले जाते. अक्रोड हे पोषक द्रव्यांचा खजिना आहे जे शरीर देणारी शक्ती प्रदान करते आणि रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत करते. अक्रोड भिजवून खाल्ले तर आरोग्यासाठी ते अधिक फायदेशीर आहे.यासाठी रात्री दोन अक्रोड पाण्यात भिजवून सकाळी रिकाम्या पोटी खा. आपण दररोज असे केल्यास, यामुळे शरीराचा बराच आजार दूर होईल.

सुक्या मेव्याचे दररोज किती प्रमाणात सेवन करावे –

जर तुम्ही आपले आरोग्य सुधृड राखू इच्छित असाल तर सुक्या मेव्याचे योग्य प्रमाणात सेवन करणे गरजेचे आहे. दररोज 5-7 मनुके,2-3 अक्रोड,7-10 बदामचे भिजवून खावे.


हे हि वाचा – भारतात लसीकरणानंतर रक्तस्राव किंवा रक्ताच्या गुठळ्या होण्याचे प्रमाण कमी, AEFI ने आरोग्य मंत्रालयाला सादर केला अहवाल

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -