स्वप्ने पाहावीत तर मोकळ्या आणि उंच आकाशाइतकी, जेणेकरून तुमची प्रगती ढगांइतकी पांढरी लख्ख आणि शुभ्र असेल. असंच आकाशात उंच भरारीचे स्वप्न पाहणाऱ्या तनुष्का सिंगचे स्वप्न पूर्ण झाले आहे आणि तिने एक नवा इतिहास रचला आहे. 24 वर्षीय फ्लाईंग तनुष्का सिंह जग्वार फायटर जेट स्क्वॉड्रनमध्ये कायमस्वरूपी दाखल होणारी भारतीय हवाई दलाची पहिली महिला पायलट ठरली आहे. त्यामुळे सैन्य कुटूंबातून पुढे आलेली तनुष्काचे तिच्या यशानंतर सर्वच स्तरातून तिचे कौतुक करण्यात येत आहे.
आजोबांकडून मिळाली प्रेरणा –
तनुष्का लखनौ शहरातील इंदिरा नगरच्या पटेल नगर परिसरात राहणारी आहे. सध्या ती सैन्याच्या अंबाला एअरबेस कॅम्प इथे तैनात आहे. खरं तर, भारतीय सैन्यात भरती होण्याची प्रेरणा तिला आजोबांकडून मिळाली आहे. तनुष्काचे आजोबा कॅप्टन डीबी सिंह, जे सैन्यातून निवृत्त झालेले आहेत.
तमिळनाडू येथील वायूसेना केद्रांत प्रशिक्षण घेतल्यानंतर तिने हॉक एमके 132 विमानावर 1 वर्ष पायलटची ट्रेनिंग घेतली. आता लवकरच जग्वार स्क्वॉड्रनमध्ये सहभागी होणार आहे. तनुष्का सिंहविषयी विशेष सांगायचे झाल्यास भारतीय हवाई दलात ट्रेनिंगवेळी अनेक महिला पायलट यांनी जग्वार उडवले आहे. पण, कुणालाही स्क्वॉड्रनमध्ये कायमस्वरूपी सहभागी होण्याची संधी मिळाली नाही. पण, तनुष्काची निवड आता करण्यात आल्याने ती पहिली महिला पायलट बनली आहे.
तनुष्काचे शिक्षण –
तनुष्का सिंहचे शिक्षण मंगळूरच्या डीपीएस एमआरपील शाळेतून झाले आहे. तर 2022 मध्ये तनुष्का सिंहने मणिपाल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी येथून इलेक्ट्रिक आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरींगमध्ये पदवीचे शिक्षण घेतले आहे. आपण लहानपणापासून एक स्वप्न पाहतो. तसंच स्वप्न तनुष्का सिंहने सुद्धा पाहिले होते. तिला भारतीय सैन्यात जायचे होते.
काही वर्षांतच भारतीय हवाई दलात महिलांना मिळणाऱ्या संधीबाबत माहिती मिळाली होती. या संधीबाबत कळताच तनुष्काने आजोबांशी चर्चा करत वायूसेनेत जाण्याचा निर्णय घेतला. यानंतर तमिळनाडूच्या डुंडीगल येथील एअरफोर्स ऍकेडमीत एमके 132 विमानावर तनुष्काने प्रशिक्षण घेतले. आजोबांप्रमाणेच तनुष्काचे वडीलही लष्करात होते. यासह तिची लहान बहीणही नौदलात जाण्याची प्रयत्नात आहे.
Jaguar विमान –
Jaguar हे भारतीय हवाई दलाचे सर्वात ताकदवान लढाऊ विमान आहे, ज्यामध्ये शत्रूच्या अचूक टार्गेटवर हल्ला करण्याची क्षमता असते.
हेही पाहा –