Thursday, September 28, 2023
Eco friendly bappa Competition
घर मानिनी Kitchen घशात माशाचा काटा अडकलाय तर 'या' घरगुती उपायांनी काढा

घशात माशाचा काटा अडकलाय तर ‘या’ घरगुती उपायांनी काढा

Subscribe

मासे खाणे आरोग्यासाठी फार फायदेशीर मानले जाते. त्यामुळेच डॉक्टर डाएटमध्ये मासे खावेत असा सल्ला देतात. परंतु मासे खाणाऱ्यांच्या घशात कधीकधी काटा अकडला जातो. त्यावेळी तो काटा नक्की काढायचा असा प्रश्न पडतो. अन्ननलिकेत तो अडकून राहिल्याने घसा ही फार दुखतो आणि काही खायला सुद्धा होत नाही. वेळीच घशात अडलेला माशाचा काटा काढला नाही तर अन्ननलिकेला फार त्रास होऊ शकतो. (Fish bone stuck in throat)

मासे खाण्याचे फायदे
माशांमध्ये ओमेगा-3 फॅटी अॅसिड, विटामिन डी, विटामिन बी2, कॅल्शियम, फॉस्फोरस, लोह, जिंक, आयोडिन, प्रोटीन असते. यामुळे मेंदू, हाडं, मसल्स मजबूत होण्यास मदत होते. तर जाणून घेऊयात घशात माशाचा काटा अडकला गेल्यास घरगुती उपायांनी कसा काढायचा याच्या काही टीप्स पाहूयात.

- Advertisement -

खरंतर माशाचा काटा घशात अडकल्यानंतर खोकला येणे, घश्यात टोचणे, पदार्थ गिळताना समस्या येणे, घशाखाली खुप जड वाटणे, घसा दुखणे, थुंकीतून रक्त येणे अशी लक्षण दिसू शकतात.

- Advertisement -

घशातील काटा काढण्यासाठी टीप्स
-जोरात खोका
-पिकलेल्या केळं खा
-ब्रेड आणि पीनट बटर खा
-सोडा प्या
-थोडं विनेगर प्यायल्याने काटा गिळला जाईल
-ब्रेड खा
-एक चमचा ऑलिव्ह ऑइल प्यायल्याने काटा निघेल

ही लक्षण दिसतील तर नक्कीच रुग्णालयात धाव घ्या
काही वेळेस काही माशांचे काटे जाड असतात. अशातच काटा घशात अडकून राहिला तर अन्ननलिकेला फार त्रास होतो. अशातच पुढील काही लक्षण दिसतील तर नक्कीच रुग्णालयात धाव घ्या. (Fish bone stuck in throat)

-छातीत दुखणे
-सूज येणे
-काहीच खातापिता न येणे
-लाळ पडत राहणे

माशाचा काटा घशात अडकू नये म्हणून काय कराल?
माशाचा काटा काटा घशात अडकू नये म्हणून तुम्ही जर घरात लहान मुलं, वृद्ध माणसं असतील तर त्यांना माशाचा काटा काढून द्या. कारण त्यांना माशाचा काटा काढून व्यवस्थितीत खाता येत नसेल तर तो घशात अडण्याची समस्या होऊ शकते. या व्यतिरिक्त मस्कुलर डिस्ट्रॉफीचे रुग्ण, सेरेब्रल पाल्सीच्या रुग्णांना सुद्धा काटा काढून द्या.


हेही वाचा- तुमच्या Olive Oil मध्ये भेसळ तर नाही ना? अशी करा शुद्ध तेलाची पारख

- Advertisment -

Manini