घरलाईफस्टाईलमासे खा; तंदरुस्त रहा!

मासे खा; तंदरुस्त रहा!

Subscribe

मासे शरीरास अत्यंत उपयोगी; जाणून घ्या फायदे

बऱ्याचदा आरोग्य उत्तम राहण्यासाठी डॉक्टर फळे, भाज्या, मासे आणि चिकन खाण्याचा सल्ला देतात. मात्र, यातील मासे हे आरोग्यासाठी उत्तम असा पर्याय आहे. संशोधनानुसार आठवड्यात ३ ते ४ वेळा मासे खाणे आरोग्यास लाभदायक आहे. मासे खाल्यामुळे वजन नियंत्रित राहते. यासोबतच अनेक समस्यांवर मासे एक रामबाण उपाय आहे.

रक्तदाबाची समस्या

- Advertisement -

माशांमध्ये शरीराला आवश्यक असणाऱ्या ओमेगा फॅटी अॅसिडचा पुरवठा होतो. यामुळे रक्तदाबाची समस्या, रक्त साचून राहणे तसेच हृदयविकाराची समस्या कमी होण्यास मदत होते.

ल्झायमरचा त्रास कमी होतो

- Advertisement -

आठवड्यातून दोनदा तरी माश्यांचा आहारात समावेश केल्यास डिमेंशिया किंवा अल्झायमर या आजाराचा धोका कमी होतो.

डोळ्यांचे आरोग्य

माशांचा आहारात समावेश केल्यास डोळ्यांच्या स्नायूंवर येणारा ताण कमी होण्यास मदत होते. त्यामुळे वाढत्या वयानुसार दृष्टी कमजोर होण्याची शक्यता कमी होते.

नैराश्य दूर होते

ओमेगा ३ फॅटी अ‍ॅसिड नैराश्याच्या समस्येवर मात करण्यास मदत करते. ज्यांच्या आहारामध्ये ओमेगा ३ फॅट्स मुबलक असतात त्यांच्यामध्ये ३० टक्के नैराश्याची लक्षणे कमी दिसतात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -