दिवसेंदिवस स्किनकेअर आणि ब्युटी ट्रिटमेंटमध्ये नवनवीन पद्धती येत आहेत. सध्या क्रेझ सुरू आहे ते फिश स्पाची. काही देशांमध्ये ‘फिश स्पा’ला पूर्णत: बंदी आहे. पण, आपल्या देशात मात्र ‘फिश स्पा’चा ट्रेंड दिवसेंदिवस वाढत आहे. खरं तर, फिश स्पा मसाजचा एक प्रकार आहे. फिश स्पा केल्याने मेंटली रिलॅक्स वाटते. ‘फिश स्पा’चे अनेक फायदे असले तरी काही जणांच्या मते, फिश स्पा केल्याने गंभीर आजारांना आमंत्रण मिळते. त्यामुळे जाणून घेऊयात, फिश स्पा करणे चांगले की वाईट?
फिश स्पा कसा करतात?
फिश स्पा पायांचे सौंदर्य वाढवण्यासाठी करण्यात येतो. फिश स्पा करताना पाय पाण्याने भरलेल्या टॅंकमध्ये टाकण्यात येतात. या टॅंकमध्ये मासे असतात. असे म्हणतात की, टॅंकमधील मासे पायातील डेड स्किन काढून टाकतात आणि त्वचा मऊ, एक्सफोलिएट करतात. पण, त्वचा सुधारणारे हे फिश स्पा त्वचेचे नुकसान करणारे आणि आजारांना आमंत्रण देणारे ठरू शकते. त्यामुळे फिश स्पा करण्याआधी त्याचे दुष्परिणाम जाणून घेणे आवश्यक आहे.
फिश स्पा करण्याचे दुष्परिणाम –
- फिश स्पा केल्याने सोरायसिस, एड्स सारख्या समस्या निर्माण होतात. कारण संक्रमित व्यक्तीने पाय ठेवलेल्या माश्यांकडून तुम्ही पुन्हा स्पा केलात तर तुम्हाला इन्फेक्शन होऊ शकते.
- स्किन इन्फेक्शनचा धोका ‘फिश स्पा’मुळे निर्माण होऊ शकतो. पाण्यामध्ये माशांसह बॅक्टेरिया असू शकतात. त्यामुळे अशा बॅक्टेरियाच्या संपर्कात आल्याने स्किन इन्फेक्शन होऊ शकते.
- स्किन टोन खराब होण्यास सुरुवात झाली असेल तर यामागे फिश स्पा करणे कारण असू शकते. त्वचा रूक्ष होणे, सूज येणे अशा समस्या ‘फिश स्पा’मुळे सुरू होण्याची अधिक शक्यता असते.
- फिश स्पा केल्याने नखांचे सौंदर्य वाढण्याऐवजी कमी होते. अनेकदा फिश स्पा करताना टॅंकमधील मासे नखे खातात. ज्यामुळे नखे खराब होऊ शकतात.
- फिश स्पा केल्याने स्ट्रेस येतो. असा त्रास फिश स्पा करताना जाणवल्यास पाय पाण्यातून त्वरीत बाहेर काढावेत.
फिश स्पा करताना घ्यावी ही काळजी –
- फिश स्पा करताना पायातून रक्तस्त्राव सुरु झाल्यास पाण्यातून पाय बाहेर काढावेत.
- पायाला आधीच दुखापत झाली असेल तर चुकूनही फिश स्पा किंवा पेडिक्युअर करू नये.
- रोगप्रतिकारशक्ती कमी असल्यास किंवा डायबिटीस असल्यास फिश स्पा करू नये.
हेही पाहा –
Edited By – Chaitali Shinde