घरलाईफस्टाईलअसे करा कान स्वच्छ

असे करा कान स्वच्छ

Subscribe

कानात मळ जमणे ही तशी सामान्य गोष्ट पण कान वेळोवेळी साफ करणं देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. कान साफ न केल्यास खाज येणे, जळजळ किंवा इतर अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं.

आपण आंघोळ करताना आपले शरीर स्वच्छ करतो. पण, शरीरातील असे काही अवयव आहेत. जे साफ करताना आपल्याला फार कठीण जाते. त्यातील एक अवयव म्हणजे कान. कान स्वच्छ कसा करावा, असा अनेकांना प्रश्न पडतो. तर बरेच जण चुकीच्या पद्धतीने कान साफ करतात. पण, आज आम्ही तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने कसे स्वच्छकरता येऊ शकतात. ते सांगणार आहोत.

बेबी ऑइल

- Advertisement -

कान साफ करण्यासाठी बेबी ऑइलचा वापर करु शकता. यासाठी बेबी ऑईलचे काही थेंब कानात घालावे आणि वरुन कापूस लावावा, असे केल्याने कानात साचलेला मळ मऊ होऊन सहज बाहेर येतो.

मिठाचे पाणी

- Advertisement -

पाणी कोमट करुन घ्यावे. त्यात थोडे बारीक मीठ घालावे. या पाण्यात कापसाचा बोळा भिजवून कापसाच्या बोळ्याने कानात पाणी सोडावे. काही वेळाने कान उलटा करावा. कान स्वच्छ होण्यास मदत होते.

ऑलिव्ह ऑईल

कानात ऑलिव्ह ऑईलचे काही थेंब सोडावे. यामुळे देखील कान स्वच्छ होतात.

कोमट पाणी

आंघोळ करताना हा उपाय तुम्ही करु शकता. कोमट पाणी आंघोळ करताना कानात सोडा.

कांद्याचा रस

कांदा वाफेवर शिजवून किंवा भाजून याचा रस काढून घ्या. त्यानंतर कापसाने रसाचे काही थेंब कानात टाका. याने मळ बाहेर पडतो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -