Wednesday, April 14, 2021
27 C
Mumbai
घर लाईफस्टाईल ह्रदय चांगलं राहण्यासाठी करावा योगा

ह्रदय चांगलं राहण्यासाठी करावा योगा

योगामुळं शरीर आणि मन दोन्ही नेहमी प्रसन्न राहते असा लोकांचा अनुभव आहे. योगामधील आसनं, प्राणायम आणि ध्यानधारणा आरोग्य आणि मुळात आपलं ह्रदय चांगलं राखण्यासाठी मदत होते.

Related Story

- Advertisement -

‘जागतिक योग दिन’ २१ जूनला साजरा करण्यात येतो. नुसतं शारीरिक स्वास्थ्य असून चालत नाही तर मानसिक स्वास्थ्यदेखील तितकंच महत्त्वाचं आहे. योगामुळं शरीर आणि मन दोन्ही नेहमी प्रसन्न राहते असा लोकांचा अनुभव आहे. योगामधील आसनं, प्राणायम आणि ध्यानधारणा आरोग्य आणि मुळात आपलं ह्रदय चांगलं राखण्यासाठी मदत होते. ह्रदय चांगलं राहण्यासाठी योगा हा उत्तम पर्याय आहे. जाणून घेऊया योगा का उत्तम पर्याय आहे याची पाच कारणं.

१) तणावापासून मुक्तता – रोजच्या ताणतणावांपासून मुक्त राहायचं असल्यास रोज दिवसातून काही वेळ योगा करावा. ध्यानधारणेमुळं तणाव कमी होण्यास मदत होते. योगाच्या सरावामुळं शरीरातील विषारी द्रव्य बाहेर फेकली जातात. ध्यानामुळं तुम्हाला शांत राहण्यास मदत होते त्यामुळं ह्रदयावर ताण येत नाही.

- Advertisement -

२) वजनात होते घट – दैनंदिन योगा केल्यामुळं वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते. योगामधील आसनांमुळं शरीरातील स्नायूंवर योग्य दबाव येऊन वजन कमी होऊन नियंत्रणात राहण्यास मदत होते. मात्र त्यासाठी रोज योगा करणं गरजेचं आहे. वजन कमी झाल्यावर आपोआपच ह्रदयावर येणारा भार कमी होतो. त्यामुळं ह्रदयाशी निगडीत आजार कमी होतात.

३) धुम्रपान रोखते – धुम्रपान हे ह्रदयविकारासाठी मुख्य कारण आहे. रोज योगा केल्यामुळं धुम्रपान करणाऱ्या व्यक्तींना धुम्रपान सोडण्यासाठी मदत होते. बरेच लोक ताणतणावात असल्यानंतर धुम्रपानाचा आधार घेतात. पण योगामुळं ताण कमी होतो त्यामुळं धुम्रपान सोडणं शक्य होतं.

- Advertisement -

४) योगामुळं रक्तदाब कमी होण्यास मदत – नियमित योगा केल्यामुळं शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी होतं. यामुळं रक्तदाबदेखील कमी होण्यास मदत होते. त्यामुळं आपोआप ह्रदयविकाराचा झटका येण्याचं प्रमाण कमी होत जातं. योगातील काही आसनं वजन कमी करण्यासाठी उपयुक्त असल्यामुळं कोलेस्ट्रॉलचं प्रमाणदेखील आपोआप कमी होऊन ह्रदयावर दबाव येत नाही.

५) ह्रदयाची काळजीसाठी उपयोगी – उच्च रक्तदाब, ताणतणाव यापासून मुक्त होण्यासाठी योगाचा उपयोग होतो. दिवसातून साधारण ४० मिनिटं योगा केल्यानं ह्रदयाची योग्य प्रकारे काळजी घेतली जाते. शरीरातील रक्तप्रवाह नीट होऊन आरोग्य उत्तम राखण्यास मदत होते.

- Advertisement -