बॉलीवूडची क्वीन आलिया भट्ट ही नेहमीच चर्चेत असते. तिचा अभिनय, फॅशन तरुणांना भुरळ पाडते. तिचा ग्लॅमर्स लूक अंदाज लगेच सोशल मीडियावर व्हायरल हॊते. आता आलिया सध्या चर्चेत आहेत ते तिच्या मेकअप रुटीनमुळे तिचा मेकअप खूप मिनिमल आणि सुंदर असतो. आज आपण या लेखातून जाणून घेऊयात आलियाचा 5 मिनिट मेकअप रुटीन
त्वचा क्लेंज करून घ्या
सर्वात आधी तुमची त्वचा स्वच्छ करून घ्या. त्वचा स्वच्छ करण्यासाठी क्लिंजरचा वापर करा. त्वचा स्वच्छ असेल तर मेकअप केल्यानंतरही तुम्हाला पिंपल्स देखील येणार नाही. त्वचा क्लेंज केल्यानंतर तुम्ही मेकअप रुटीनला सुरुवात करू शकता.
त्वचा मॉइश्चराइज
मेकअप करण्याआधी त्वचा मॉइश्चराइज करून घ्या. मॉइश्चराइज केल्याने त्वचा चांगली राहील आणि मेकअप देखील चांगला दिसेल. मॉइश्चरायझर लावल्याने त्वचा स्वच्छ राहील आणि सहजपणे तुम्ही मेकअप करू शकता आणि जास्त काळ टिकेल.
ब्लशचा वापर करा
गालांवर हलका ब्लश लावून घ्या. ज्यामुळे तुमचे गाल गुलाबी दिसेल आणि हातानी किंवा ब्रशच्या साहाय्याने पसरून घ्या. याने तुमचे गाल नैसर्गिकरित्या गुलाबी दिसेल.
लिपस्टिक शेड
लूक परिपूर्ण आणि सुंदर बनवण्यासाठी तुम्ही ग्लॉसी आणि ग्लॅमर्स लिपस्टिक शेडचा वापर करू शकता. जर तुम्हाला गुलाबी आणि लाल रंग आवडत नसेल तर तुम्ही न्यूड लिपस्टिक शेड्स देखील वापरू शकता. या शेड्स तुम्ही रोज देखील लावू शकता.
आयब्रोज ब्रश करून घ्या
जर तुम्हाला पॉलिश लूक पाहिजे असेल तर तुम्ही आयब्रोज आधी पेन्सिलने डार्क करून घ्या. त्यानंतर ब्रश करून घ्या त्यामुळे तुम्हाला सुंदर लूक मिळेल.
मस्कारा
मस्काराचा वापर फक्त पापण्या सुंदर दिसण्यासाठी केला जातो. त्यामुळे तुमचे डोळे अधिक सुंदर आणि आकर्षक दिसतात. म्हणून, मेकअप करताना मस्कारा लावणे खूप महत्वाचे आहे.
ल्यूमिनस क्रीम
मेकअप झाल्यावर शेवटी ल्यूमिनस क्रीम लावायला विसरू नका. यामुळे तुमच्या गालाला शिमर इफेक्ट मिळेल आणि चेहरा सुंदर आणि ग्लोइंग दिसेल. तुम्ही संपूर्ण चेहऱ्यावर देखील ल्यूमिनस क्रीम लावू शकता.
हेही वाचा : Beauty Tips : टॅन स्किनसाठी घरीच बनवा फेसपॅक
Edited By : Prachi Manjrekar