स्वयंपाक घरात जेवण बनवण्यासोबत काही साध्या-सोप्या टीप्स देखील गरजेच्या असतात. ज्या जेवन करताना खूप उपयोगी येतात. ज्या आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
जेवण बनवताना वापरा ‘या’ टिप्स
- Advertisement -
- दुध फ्रीज बाहेर टिकवायचे असेल तर त्यामध्ये साखर घालून ठेवा.
- कॉफीप्रेमींसाठी – इन्स्टंट कॉफी, साखर यांच्या मिश्रणावर एखादा चमचा गरम पाणी घालून मग वरून दूध घालावं, दूध जमेल तेवढं उंचावरून घालावं. सुंदर स्वाद व फ्लेवर येतो.इन्स्टंट कॉफी बनवताना साखर आणि दुधाची पावडर मिक्सरमध्ये बारीक/एकजीव करा. कपात घेऊन त्यावर गरम पाणी/दुध घालून ढवळा.
- गुळाच्या पोळ्या करताना पोळ्या खूप जाड किंवा फार पातळ नसाव्यात फार पातळ झाल्यास आतील सारण तव्याला चिकटण्याची शक्यता असते. जर आतील सारण कडेपर्यंत जात आही असे झाले तर कातण्याने पोळीच्या कडा कापून घ्याव्यात.
- फरसबी, मटारचे दाणे, भोपळी मिरची इ. भाज्या शिजवताना आधी हळद, मीठ घातलेल्या पाण्यात भाज्या शिजवाव्या. यामुळे रंग हिरवागार राहतो.
- अळूच्या वड्या करताना पाने स्वच्छ पुसून थोडेसे तेल लावावे आणि वरून पीठ पसरावे. यामुळे वड्या चुरचुरीत होतात.
- लाल भोपळा, कलिंगड, खरबूज यांच्या बिया कडक उन्हात वाळवाव्यात. नंतर सोलून साठवून ठेवाव्यात. पदार्थ गार्निश करण्यासाठी त्याचा उपयोग होतो.
- सुगंध यावा यासाठी दही विरजताना त्यात कढीपत्त्याची दोन तीन पाने टाकावीत.
हेही वाचा :