अलीकडच्या व्यस्त जीवनशैली आणि खाण्या-पिण्याच्या बदलत्या सवयींमुळे चेहर्यावर पिंपल्स, मुरुम येतात. यासाठी बाजारातील अनेक केमिकल उत्पादनांचा काहीजण वापर करतात.मात्र, त्यांचा परिणाम हा कायमस्वरुपी नसतो. मुरुम घालवण्यासाठी तुम्ही खालील उपाय करु शकता.
मुरुम कमी करण्यासाठी करा ‘हे’ सोप्पे उपाय
- बर्फ थेरपी
चेहर्यावर मुरुम आल्यास त्यावर बर्फ लावणे उत्तम मानले जाते. यामुळे मुरुमांचा लालसरपणा कमी होतो. तसेच सूजही कमी होते. बर्फ लावल्याने मुरुम कमी होण्यास मदत होते. कपड्यामध्ये बर्फ घेऊन तो मुरुमांच्या जागी काही वेळ ठेवा. ही प्रक्रिया दिवसभरात 2-3 वेळा करा.
- स्टीम
चेहर्यावर चमक हवी असल्यास स्टीम गरजेचे आहे. यामुळे केवळ चेहर्यावरील घाण दूर होत नाही तर त्वचा मुलायम होण्यास मदत होते. स्टीममुळे रोमछिद्रे खुली होतात. यामुळे त्वचा श्वास घेऊ शकते.
- अंड्यातील सफेद भाग
अंड्यातील सफेद भागात प्रोटीन असते. अंड्यातील सफेद भागामुळे चेहर्यावरील मुरुमांचे डाग कमी होण्यास मदत होते. यासाठी अंड्यांचा सफेद भाग थोडा फेटून मुरुमांवर लावा. जेव्हा सुकेल तेव्हा चेहरा कोमट पाण्याने धुवून टाका.
- टोमॅटो
टोमॅटो तेलकट त्वचेसाठी उपयुक्त असतात. टोमॅटोमुळे ब्लॅकहेड्स तसेच चेहर्यावरील काळेपणा दूर करण्यास उपयोग होतो. ताज्या टोमॅटोचा रस काढून चेहर्यावर लावा. त्यानंतर एका तासाने चेहरा धुवा.
- केळ्याची साल
केळे खाणे शरीरासाठी जितके फायदेशीर तितकेच केळ्याची साल देखील उपयोगी असते. मुरुमे झाल्यास केळ्याच्या सालीच्या आतील भाग चेहर्यावरुन फिरवा. 5 मिनिटे तसेच ठेवा. त्यानंतर चेहरा धुवून टाका.
हेही वाचा :