Thursday, December 12, 2024
Maharashtra Assembly Election 2024
घरमानिनीHealth Tips : मासिक पाळीचा त्रास कमी करण्यासाठी करा हे उपाय

Health Tips : मासिक पाळीचा त्रास कमी करण्यासाठी करा हे उपाय

Subscribe

प्रत्येक महिलेला मासिक पाळी दरम्यान त्रास हॊतॊ. प्रत्येक महिलेचा त्रास हा वेगळा असतो. काहींना पोटदुखी, पाठदुखी, डोकेदुखी किंवा थकवा जाणवतो, तर काहींना मानसिक त्रास, जसे की चिडचिड, चिंता किंवा नैराश्य जाणवते. हा त्रास हार्मोन्समधील बदलांमुळे आणि शरीराच्या प्रतिक्रियांमुळे होतो.हा त्रास जर वारंवार होत असेल तर, रोजच्या कामांवर याचा परिणाम होतो. त्यामुळे आज आपण काही उपाय जाणून घेऊयात, ज्याने मासिक पाळीचा त्रास कमी होऊ शकतो.

भरपूर पाणी प्या

आपल्या चांगल्या आरोग्यासाठी पाणी खूप महत्वाचे असते. मासिक पाळी दरम्यान आपल्या शरीरातील पाणी कमी होते. त्यामुळे आपल्याला अजून वेदना होतात त्या कमी करण्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त पाणी प्या. शक्यतो गरम पाण्याचे सेवन करा याने आपल्या स्नायूंना आराम मिळतो. रक्त प्रवाह देखील कमी होतो.

- Advertisement -

योगा करा

या दिवसात व्यायाम करणे अवघड असले तरी थोडा वेळ योगा किंवा व्यायाम करा. याने तुमचा पोटदुखीचा त्रास कमी होईल.

ओटीपोटावर गरम पाण्याची पिशवी ठेवा

तुम्ही ओटीपोटावर गरम पाण्याची पिशवी ठेवून शेक घेऊ शकता. याने मासिक पाळी दरम्यान होणाऱ्या वेदना कमी होतील.

- Advertisement -

पोटाला तेलाने मसाज करा

तुम्ही हलक्या हाताने पोटाला मसाज करू शकता. मसाज केल्याने तुमच्या स्नायूंना आराम देखील मिळेल. तसेच रक्त प्रवाह देखील कमी होते.

आहारात बदल करा

मासिक पाळी दरम्यान तुमच्या आहारात बदल करणे गरजेचं आहे. या दिवसात जास्त तेलकट किंवा मसालेदार पदार्थांचं सेवन करू नका. कॉफी किंवा चहा इत्यादी पेय देखील टाळा याने तुम्हाला क्रॅम्स होऊ शकतात. आहारात हिरव्या पालेभाज्या: पालक, मेथी, कोथिंबीर यांचा समावेश करा. यामध्ये लोह आणि मॅग्नेशियम असते, जे स्नायूंची वेदना कमी करण्यास मदत करते.

ताण कमी घ्या

जास्त स्ट्रेस घेतल्यामुळे तुम्हाला मासिक पाळी दरम्यान त्रास होऊ शकतो. त्यामुळे ताण घेऊ नका.

हेही वाचा : Winter Health : हिवाळ्यात शरीराला उबदार ठेवतील हे लाडू


Edited By : Prachi Manjrekar

- Advertisment -

Manini