प्रत्येकाची स्किन ही वेगवेगळ्या प्रकारची असते. काही लोकांची त्वचा जास्त ड्राय असते तर काहींची त्वचा जास्त तेलकट, प्रत्येकाच्या त्वचेच्या समस्या या भिन्न असतात. यासाठी तुम्ही वेळीच तुमच्या त्वचेचा प्रकार जाणून त्यावर उपाय करू शकता. उन्हाळ्या प्रमाणे हिवाळ्यात देखील त्वचा तेलकट होते. हिवाळ्यात त्वचा तेलकट होणे ही खूप सामान्य समस्या आहे, विशेषतः कॉम्बिनेशन किंवा ऑयली स्किन असलेल्या लोकांसाठी.हिवाळ्यात, जर तुमची त्वचा तेलकट दिसत असेल, तर चेहऱ्यावर टॅनिंग लगेच दिसत. त्यामुळे त्वचेवर मुरम देखील येऊ लागतात. त्यामुळे आज आपण जाणून घेऊयात, चेहऱ्याचा तेलकटपणा दूर कसा करायचा.
स्क्रबचा वापर करा
हिवाळ्यात त्वचा जास्त तेलकट होते. त्यामुळे चेहऱ्यावर त्वचेशी संबंधित समस्या उद्भवू लागतात.थंडीच्या दिवसात त्वचा वारंवार तेलकट होत असेल तर चेहऱ्याच्या खोलवर घाण जमा होऊन आपल्याला मुरम किंवा पुरळ येऊ लागतात. वेळीच यावर उपचार केले नाही समस्या अजून वाढू शकते. त्यामुळे तुम्ही तुमची स्किन स्क्रबने स्वच्छ करू शकता. याने चेहऱ्याचा तेलकटपणा कमी होईल.
टी ट्री ऑयल आणि गुलाब पाणी
तुम्ही चेहऱ्यावरील तेलकटपणा कमी करण्यासाठी टी ट्री ऑयल किंवा गुलाब पाण्याचा वापर करू शकता. यामध्ये अँटी-बॅक्टेरियलचे गुणधर्म असतात. ज्यामुळे त्वचा स्वच्छ राहते आणि चेहऱ्यावरील घाण पूर्णपणे निघून जाते . तेलकटपणा देखील दूर होतो.
काकडीचा रस
काकडीचा रस किसून त्याचा रस कापसाच्या मदतीने चेहऱ्यावर रोज लावल्याने त्वचेवरील तेलकटपणा कमी होतो.
बेसन आणि हळद
एक चमचा बेसन आणि अर्धा चमचा हळद मिक्स करून चेहऱ्यावर लावा. हलक्या हाताने चेहऱ्याचा मसाज करा. मिश्रण सुकल्यानंतर पाण्याने चेहरा स्वच्छ धुऊन घ्या.
तेलकट त्वचा नियंत्रित राहण्यासाठी त्वचेची अशी काळजी घ्या
- दिवसातून दोनदा चेहरा फेस वॉशने स्वच्छ धुवा.
- फेस वॉश करताना चेहरा जोरात स्क्रब करू नका.
- कामाचा ताण कमी घ्या, याने आपली त्वचा देखील चांगली राहील.
हेही वाचा : Winter skin Care : या तेलामुळे ड्राय स्किनला देखील येईल ग्लो
Edited By : Prachi Manjrekar