हिवाळ्यात आपली त्वचा कोरडी आणि निस्तेज होऊ लागते. हिवाळ्यात आपल्याला बऱ्याचदा पार्टी किंवा फंक्शनमध्ये जावे लागते. आपल्या आऊटफिट आणि ज्वेलरी प्रमाणे मेकअप देखील महत्वाचा भाग आहे. पार्टी किंवा फंक्शनमध्ये मेकअप केला तर काही वेळाने आपली त्वचा खूप कोरडी दिसू लागते. विशेषतः कोरड्या त्वचेवर मेकअप लावणे ही एक मोठी समस्या बनते. मेकअप केल्यानंतर त्वचेवर भेगा दिसू लागतात. त्यामुळे त्वचा अजूनच खराब होते. हिवाळ्यात मेकअप करताना तुम्हाला ही त्रास होतो का ? आज आपण जाणून घेऊयात हिवाळ्यात मेकअप करण्याआधी कोणत्या टिप्स फॉलो केल्या पाहिजे.
हिवाळ्यात मेकअप करण्याआधी हे काम करा
मसाज करा
हिवाळ्यात तुम्ही मेकअप करत असाल तेव्हा तुमच्या त्वचेला मॉइश्चरायझरने मसाज करा. बोटांच्या सहाय्याने चेहऱ्याला साधारण 2 मिनिटे हलक्या हाताने मसाज करा.यामुळे रक्ताभिसरण सुधारते आणि त्वचा मुलायम होते. असे केल्याने मेकअप त्वचेवर चांगला सेट होईल. मेकअप केल्यानंतरही त्वचा कोरडी अजिबात जाणवणार नाही.
क्रीम लिक्विड
हिवाळ्यात मेकअप करण्यापूर्वी त्वचेला हायड्रेट करणे सर्वात महत्त्वाचे असते. यासाठी प्रथम काही क्रीम घेऊन त्याने चेहऱ्याला मसाज करा आणि नंतर चेहऱ्यावर प्राइमर लावा. हिवाळ्यात शक्यतो फक्त क्रीमी लिक्विड फाउंडेशन वापरण्याचा प्रयत्न करा. हे फाऊंडेशनमध्ये मिसळून तुम्ही लिक्विड इल्युमिनेटर लावू शकता, यामुळे त्वचा मुलायम आणि चमकदार दिसेल.
लिप ग्लॉस महत्वाचे
हिवाळ्यात आपले ओठ सहजपणे कोरडे होतात. अशावेळी तुम्ही मॅट लिपस्टिक लावू शकता. या मॅट लिपस्टिकमुळे तुमचे ओठ कोरडे देखील दिसणार नाही. कोणतीही लिपस्टिक लावताना ओठांवर लिपस्टिक लावण्यापूर्वी थोडे लिपग्लॉस लावणे चांगले. हिवाळ्यात मॅट लिपस्टिकऐवजी ग्लॉसी लिपस्टिक लावा. यामुळे तुमचे ओठ चांगले दिसतील.
ग्लॉसी मेकअप वापरा
हिवाळ्यात शक्यतो, ग्लॉसी मेकअप करा. याने मेकअपने तुमची त्वचा कोरडी आणि निस्तेज देखील दिसणार नाही. तसेच तुम्ही व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन ई आणि अँटिऑक्सिडंट्स भरपूर असलेले मेकअप प्रोडकट्स वापरा. याने तुमच्या त्वचेला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. फाउंडेशन किंवा कन्सीलरमध्ये व्हिटॅमिन सी आणि ई असणे विशेष महत्वाचे आहे. हे घटक आपल्या त्वचेसाठी खूप आवश्यक असतात.
या मेकअप टिप्सने हिवाळ्यात तुमचा चेहरा सुंदर आणि आकर्षक दिसेल.
हेही वाचा : Winter Health Tips : हिवाळा आणि मानसिक आरोग्य
Edited By : Prachi Manjrekar