Saturday, March 15, 2025
HomeमानिनीParenting Tips : मुलांचे मित्र होण्यासाठी फॉलो करा या टिप्स

Parenting Tips : मुलांचे मित्र होण्यासाठी फॉलो करा या टिप्स

Subscribe

पालक आणि मुलांचे नाते मैत्रीपूर्ण असणे अत्यंत गरजेचं आहे. मैत्रीपूर्ण नाते असले की, मुले आपल्या समस्या निर्धासपणे सांगतात. पालक आणि मुलांमधील नाते फक्त शिस्त लावणारे किंवा मार्गदर्शन करणारे असावे असे नाही, तर ते विश्वास आणि मैत्रीने भरलेले असले तर मुलं कधीही कोणतीही गोष्ट लपवत नाही. मुलांच्या मनातील भावनांना समजून घेऊन, त्यांच्याशी खुल्या मनाने संवाद साधून पालक त्यांचे खरे मित्र होऊ शकतात.आज आपण या लेखातून जाणून घेऊयात मुलांचे मित्र होण्यासाठी कोणत्या टिप्स फॉलो करायच्या.

मोकळेपणाने संवाद साधा

 मुलांशी मोकळेपणाने संवाद साधा. मुलांशी नियमितपणे बोलणे आणि त्यांच्या विचारांना महत्त्व देणे आवश्यक आहे. रोजच्या छोट्या गप्पांमधूनच विश्वास वाढतो.

मुलांना समजून घ्या

बऱ्याचदा पालक मुलांचं काही ऐकून न घेता त्यांना ओरडू लागतात. वारंवार मुलांना ओरडल्यामुळे मुलं तुमच्या पासून दूर जाऊ लागतात. तुम्ही त्यांना ओरडणार या भीतीने ते तुमच्या पासून गोष्टी लपवू लागतात. त्यामुळे प्रत्येक गोष्टीवर फक्त ओरडण्याऐवजी त्यांचे विचार ऐका आणि त्यांना योग्य मार्ग दाखवा.

चुका सुधारण्याऐवजी समजून घ्या

जर मुलांकडून चूक झाली, तर लगेच शिक्षा करू नका. आधी त्यांच्या बाजूने विचार करा आणि त्यांना योग्य मार्ग दाखवा. मुलांकडून परत ही चूक होणार नाही याची काळजी घ्या.

मुलांसोबत वेळ घालवा

हल्लीच्या व्यस्त जीवनशैलीमुळे आई आणि वडील दोघे व्यस्त असल्यामुळे मुलांसोबत वेळ घालवता येत नाही. अशाने मुलं दुरावतात त्यामुळे मुलांसोबत जास्तीत जास्त वेळ घालवा. एकत्र खेळा, फिरा किंवा जेवण करा, यामुळे त्यांना सुरक्षित आणि प्रेमळ वाटते.

मुलांच्या विचारांना प्रोत्साहन द्या

मुलांच्या विचारांना प्रोत्साहन द्या.त्यांचे निर्णय घेण्याचे कौशल्य वाढवण्यासाठी त्यांना स्वातंत्र्य द्या.त्यांच्या कल्पनांना पाठिंबा द्या आणि मार्गदर्शन करा.

विश्वास ठेवा

जर मुलांनी काही गोष्टी तुमच्यासोबत शेअर केल्या, तर त्या दुसऱ्यांसमोर उघड करू नका. त्यामुळे त्यांचा तुमच्यावरचा विश्वास वाढेल.

हेही वाचा : Parenting Tips : दबाव टाकल्याने बिघडू शकते मुलांचे मानसिक आरोग्य


Edited By : Prachi Manjrekar

Manini