प्रत्येक ऋतूत हवामानामध्ये अनेक बदल होत असतात. हिवाळ्यात थंडी जास्त असल्यामुळे या काळात आपण लगेच आजारी पडतो. अशातच व्हायरल इन्फेक्शन ही जवळपास प्रत्येक घरातील सामान्य समस्या ठरते. ताप सर्दी आणि खोकला हे सर्व आजरा लगेच उद्भवतात. त्यामुळे आपली रोगप्रतिकारशक्ती देखील कमी होते. बदलत्या हवामानामुळे आणि व्हायरल इन्फेक्शनमुळे गंभीर आजार होऊ शकतात. त्यामुळे आपल्या आरोग्याकडे वेळेवर लक्ष देणे गरजेचं आहे. दुर्लक्ष केल्यास या समस्या वाढू शकता. आज आपण जाणून घेऊयात, हिवाळ्यात निरोगी राहण्यासाठी कोणते उपाय आपण करू शकतो.
हिवाळ्यात हे आजार लगेच उद्भवतात
- थंड हवामानामुळे शरीरातील रक्तवाहिन्या आकुंचित होतात, ज्यामुळे रक्तप्रवाह कमी होतो हृदयविकाराचा धोका संभवतो.
- हिवाळ्यात बॅक्टरीयास लगेच पसरतात त्यामुळे फुफ्फुसाचे आजार होतात.
- थंड वातावरणामुळे आपली त्वचा कोरडी पडते . तसेच त्वचेचे देखील आजार होतात.
- दमा असलेल्या व्यक्तींना या दिवसात जास्त त्रास होतो.
- या दिवसात हवामान थंड असल्यामुळे सर्दी, छातीत दुखणे, खोकला, श्वास घेण्यास अडचणी निर्माण होतात.
निरोगी राहण्यासाठी हे उपाय करा
उबदार कपडे घाला
थंडीच्या दिवसात नेहमी उबदार कपडे घालावे. जेणेकरून तुम्हाला थंडी वाजणार नाही आणि सर्दी देखील होणार नाही.
नियमित व्यायाम करा
नियमित व्यायाम केल्याने तुमची रोगप्रतिकारशक्ती देखील वाढेल. तुम्ही आजारी देखील पडणार नाही.
कोमट पाणी प्या
या दिवसात कोमट पाणी प्यायल्याने सर्दी ताप खोकला इत्यादी आजारांपासून आपण दूर राहताे.
डॉक्टरांचा सल्ला घ्या
जास्त त्रास होत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.
पौष्टिक आहार घ्या
हिवाळ्यात आपली रोगप्रतिकारशक्ती कमकुवत असते. त्यामुळे या दिवसात पौष्टिक आहार घ्या. पौष्टिक आहार घेतल्याने तुमच्या शरीराला आवश्यक घटक मिळतील.
बाहेरच खाणे टाळा
प्रत्येकाला बाहेरचे पदार्थ खायला खूप आवडतात. या पदार्थांमध्ये तेल, मसाले, मैदा इत्यादी घटक जास्त असल्यामुळे तसेच या दिवसात आपली रोगप्रतिकारशक्ती कमी असल्यामुळे आपण लगेच आजारी पडतो. त्यामुळे या दिवसात बाहेरच पदार्थ खाणे टाळा.
हेही वाचा : Reduce Dust Allergy : धुळीच्या ॲलर्जीवर हे घरगुती उपाय करा
Edited By : Prachi Manjrekar