टिकली किंवा कुंकू हे सोळा श्रृंगारापैकी एक आहे. तसेच टिकली हा भारतीय हिंदू संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग मानला जातो. आज जरी स्टाईल स्टेटमेंट, सौंदर्य वाढवण्यासाठी किंवा चेहऱ्याचे सौंदर्य वाढवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या टिकल्या लावल्या जात असल्या तरी त्याची परंपरा शतकानुशतके सुरू आहे. तुम्हाला माहीत आहे का? कपाळावर टिकली लावण्यामागे केवळ हिंदू धर्मच नव्हे तर वैज्ञानिक तथ्येही जोडली गेली आहेत.
टिकलीला बिंदिया, कुंकू, अशा अनेक नावांनी टिकल्याना ओळखले जाते. हिंदू धर्मात विवाहित स्त्रिया रंगीबेरंगी टिकल्या लावतात. तर लाल रंगाची टिकली देवी लक्ष्मीशी संबंधित आहे. ज्योतिषशास्त्रातही लाल रंग हा मंगळाचा कारक मानला गेला आहे. त्यामुळे लाल टिकली लावणाऱ्या विवाहित महिलांच्या आयुष्यात आनंद असतो. तसेच जसा आपला चेहरा असेल तश्या जर का तुम्ही टिकल्या लावल्या तर तुम्हाला जास्त चांगल्या प्रकारे सूट होतात.
चेहऱ्यानुसार ‘अशा’ निवडा टिकल्या
- सर्वात महत्त्वाचे आपल्या चेहऱ्याचा आकार घेऊन त्यानुसार टिकलीची निवड करायला हवी.
- गोल चेहऱ्याला उभट टिकली, उभट चेहऱ्याला गोल टिकली, त्रिकोणी किंवा हार्ट शेप चेहऱ्याला कोणत्याही आकाराची टिकली छान दिसते.
- टिकलीची निवड करताना आपला हेअरकट आणि हेअरस्टाईल यांचाही आवर्जून विचार करायला हवा.
- तुम्ही केस बांधणार असाल तर थोडी मोठ्या आकाराची टिकली लावू शकता पण मोकळे सोडणार असाल तर थोडी लहान आकाराची टिकली चांगली दिसेल.
- तुमचे केस कपाळावर येणार असतील तर नाजूक टिकलीमुळे तुमचे सौंदर्य खुलून यायला मदत होईल.
- आपले डोळे आणि कपाळाचा भाग मोठा असेल तर आपल्याला थोडी मोठ्या आकाराची टिकली चांगली दिसेल.
- यामुळे चेहरा बॅलन्स व्हायला मदत होईल. यामध्येही आपण वेगवेगळे आकार आणि डिझाईन्स याचे प्रयोग करु शकता.
- तसेच आपल्या कपड्यांप्रमाणे आणि मेकअपप्रमाणे आपण टिकलीची निवड करायला हवी.
- थोडा लाईट मेकअप असेल तर साधी नेहमीची काली किंवा मरुन रंगाची टिकली चांगली दिसेल.
- पण एखादा कार्यक्रम असेल तर कपड्यांना रंगीत किंवा थोडी डिझायनर टिकली चांगली दिसू शकेल.
- खड्याची किंवा मोत्याची टिकली लावल्यावर आपल्याला जवळून ती चांगली दिसते. मात्र लांबून अशी टिकली दिसून येत नाही.
- त्यामुळे घरच्या घरी लहान कार्यक्रमासाठी अशी टिकली लावली तर चालते.
- पण मोठ्या कार्यक्रमात दूरवरच्या लोकांना ती दिसून येत नाही.
- तसेच फोटोतही अशी खड्याची टिकली उठून येत नसल्याने ती लावताना विचार करायला हवा.
- अशातच जर का तुम्हाला खड्याची टिकली लावायची असेल तर कलरफुल आणि मध्ये डायमंड असलेली टिकली निवडावी.