कपडे धुतल्यानंतर ते प्रेस करणे मोठे कंटाळवाणे काम आहे. जर तुम्ही देखील तुमचे कपडे घरीच प्रेस करत असाल तर, आम्ही तुमच्यासाठी काही सोप्या टीप्स घेऊन आलो आहेत. या टीप्सचा वापर करुन तुम्ही कमी वेळेत आणि कमी मेहनतीत कपडे प्रेस करु शकता.
- प्रत्येक कपड्यावर पाणी स्प्रे करण्याऐवजी तुम्ही एक स्वच्छ टॉवेल ओला करा. यानंतर हे हलक्या हाताने पिळून घ्या. तुम्ही जेवढ्या कपड्यांना प्रेस करणार आहात तेवढे कपडे त्या टॉवेलमध्ये गुंडाळून ठेवा. असे केल्याने एका-एका कपड्यावर स्प्रे करण्याची गरज पडणार नाही. कपड्यात हलका ओलावा येईल.
- कपड्यांना ड्रायरने वाळवण्याच्या पध्दतीने देखील तुमचा वेळ वाचू शकतो. स्लो स्पिनवर कपडे वाळवल्यावर ते जास्त गोळा होत नाही. ज्यामुळे त्यांना प्रेस करताना कमी मेहनत करावी लागते.
- कपडे धुतल्यानंतर योग्य प्रकारे ठेवणे देखील महत्त्वाचे आहे. जर तुम्ही ते तसेच गोळा झालेले ठेवले तर त्यावर प्रेस करताना जास्त मेहनत घ्यावी लागते. अशात त्यांना योग्य प्रकारे ठेवणे महत्त्वाचे आहे.
- कपडे धुतल्यानंतर ऊन्हात वाळवताना ते तसेच दोरीवर टाकू नका. या अगोदर कपडे दोन्ही हातांनी झटकून घ्या. असे केल्याने ते काही प्रमाणात सरळ होतील आणि अशा प्रकारे वाळवलेले कपडे प्रेस करण्यास सोपे जाईल.